Amazon

Ads Area

header ads
header ads

'अनिरुद्ध देशमुख हरवला आहे' संपर्क साधण्यासाठी पाहा भन्नाट पोस्ट.... नवीन ट्विस्ट

 

       स्टार प्रवाह वरील लोकप्रिय ठरलेली मालिका 'आई कुठे काय करते 'मध्ये  अनेक नवीन वळणे घेत आहे. मालिका प्रेक्षकांना उत्सुक राहण्यास भाग पाडत आहे. त्यामध्ये अनिरुद्ध म्हणजेच मिलिंद गवळी त्याचप्रमाणे संजना यांचा लग्नाचा घाट घातलेला होता पण लग्नात एक ट्विस्ट येणार आहे. चला तर पाहूया काय आहे हा धमाकेदार आणि संजनाला तोंडावर पाडणारा  ट्विस्ट.


🌠नक्की काय घडले?

▪️अनिरुद्ध झाला गायब तेही लग्नाच्या दिवशी.

▪️प्रेक्षकांना ही बसला खूप मोठा धक्का.

▪️आता मिलिंद गवळी यांनीही सुरू केली आहे अनिरुद्ध च्या शोध मोहीमाला.


छोट्या पडद्यांवर लोकप्रिय ठरलेली स्टार प्रवाह वरील मालिका आई कुठे काय करते यामध्ये नवनवे ट्विस्ट येत आहेत.

प्रेक्षकांची उत्सुकता आणि मालिकेची रंजकता वाढवण्यासाठी करण्यात येणाऱ्या अनेक प्रयत्नास यशही मिळत आहे. अशातच प्रोमोमध्ये दाखवलेल्या अनिरुद्ध आणि संजना चा लग्नाचा घाट होतोय का नीट पार. ऐन लग्नाच्या दिवशी अनिरुद्ध गायब झाले आहेत. संजना पडली तोंडावर की अनिरुद्ध आहे संकटात. पण संजना या घटनेसाठी अरुंधती ला जबाबदार धरत तिच्याजवळ आणि अनिरुद्ध ची चौकशी करत आहे .पण त्याचा फारसा उपयोग होत नाहीये. लग्नाच्या महत्वाच्या दिवशी अनिरुद्ध नेमका गेला कुठे असा प्रश्न संजना प्रमाणे प्रेक्षकांनाही पडला आहे.





यावर उपाय म्हणून मालिकेत आणि अनिरुद्ध ची भूमिका साकारणारे मिलिंद गवळी यांनीही प्रयत्न सुरू केले आहेत.अनेक पोस्ट इंस्टाग्राम स्टोरी वर दोनदा अपलोड केले आहेत. चाहत्यांना अनिरुद्ध ला शोधण्याचे आव्हान केला आहे. मिलिंद गवळी यांनी शेअर केलेल्या पोस्टमुळे सोशल मीडियावर त्याचप्रमाणे नेटकऱ्यांमध्ये चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनिरुद्ध झालाय काय गायब पण मिलिंदने केले हास्याचा वातावरण. हे जबरदस्त पोस्टर खरं तर एका युजर ने बनवलेला आहे ज्यावर अनिरुद्ध देशमुख हरपला असे लिहिला आहे आणि पत्ता बोरवली समृद्धी बंगला असा देण्यात आला आहे संपर्कासाठी संजनाचा फोन नंबर ही सुचवला आहे. रंग ,उंची लिहून कुणाला अनिरुद्ध ला ओळखण्यास सोईस्कर भाग म्हणून असे लिहिण्यात आले आहे. याची माहिती देणाऱ्या ला लग्नाला बोलवलं जाईल अशी मोठ्यात मोठं बक्षीसही जाहीर केला आहे.



लग्नासाठी उतावीळ झालेली संजना आता तोंडावर पडली आहे हे पाहून तरी प्रेक्षकांमध्ये कुजबुज होत आहे. दुसऱ्या बाजूला अरुंधतीने आपल्या कुटुंबाचे बाजू घेत असताना संजनाला काहीही केल्यास तिचे बोट काढून हातात देईन असा धमकी दिली आहे.

चला आणखी काय ट्विस्ट येणार हे कळलेच आणि अनिरुद्ध सापडणार का तेही पाहूया...



अशाच नवीन नवीन अपडेट साठी जीवन मराठी व्हाट्सअप पेज ला फोलो करा.https://www.jeevanmarathi.com/

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या