Amazon

Ads Area

header ads
header ads

New serial update: सुर नवा ध्यास नवा मधील मॉनिटर 'हर्षद नायबळ'दिसणार आता या नव्या मालिकेत ! हर्षदला मिळाली ही भूमिका साकारण्याची संधी.

आपल्या गोड आवाजाने  महाराष्ट्राला वेड लावलेला गायक तसेच बालकलाकार मॉनिटर हर्षद नायबळ हा प्रेक्षकांचा लाडका ठरला आहे. नवीन बातमी म्हणजे हर्षद आता लवकरच मालिकासृष्टीत उतरणार आहे.  तो नेहमी  अधिक चांगल्या पद्धतीने अभिनय करण्याचा प्रयत्न करत असतो आणि हाच त्याचा गुण प्रेक्षकांना खूपच भावतो.तो नेहमीच मन लावून भूमिका साकारण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला त्यात यशही मिळते. म्हणूनच स्टार प्रवाह वर नवीन येणाऱ्या मालिकेमध्ये त्याला महत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी देण्यात आली आहे.

स्टार प्रवाहवर थोड्याच दिवसात 'पिंकीचा विजय असो' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.त्यामध्ये पिंकी या मुख्य अभिनेत्रीच्या लहान भावाची भूमिका हर्षद ने साकारली आहे.
मालिकेत हर्षद चे नाव दिप्या असं आहे. लहान असला तरी खूप समंजस आणि मदत करणारा आहे. हर्षद गाणे तर उत्तम गातोच पण अभिनय सुद्धा जबरदस्त करतो.

'पिंकी चा विजय असो' मालिकेच्या सेटवर हर्षद सर्वांचा लाडका असून तो त्याच्या गाण्यानं सर्वांचच  खूप मनोरंजन करत असतो. 
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads