Darling हा चित्रपट यावर्षी 10 डिसेंबर रोजी रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांसह सिनेसृष्टीत चर्चेचा विषय झाला आहे. समीर पाटील यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले असून आतापर्यंत ते नेहमीच प्रवाहापेक्षा वेगळ्या धाटणीच्या विषयावर चित्रपट दिग्दर्शन करतात आणि यामुळेच त्यांच्या या 'डार्लिंग' मराठी चित्रपटा कडून प्रेक्षकांच्या आणि चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सोशल मीडियावर 'डार्लिंग' ट्रेलरला तुफान प्रतिसाद लाभला आहे.
चित्रपटामध्ये प्रथमेश परब आणि रितिका श्रोत्री यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर निखिल चव्हाण, मंगेश कदम, आनंद इंगळे, यांच्या सुद्धा महत्वाच्या भूमिका या चित्रपटात आहेत. प्रथमेश परब आणि रितिका श्रोत्री यांची जोडी या अगोदर 'टकाटक' मराठी चित्रपट मधून भेटीस आली होती. या चित्रपटाला त्यांच्या चाहत्यांनी आणि प्रेक्षक वर्गाने पसंती दर्शवली होती.
'डार्लिंग' मराठी चित्रपटाच्या संगीताबद्दल बोलायचं तर चिनार- महेश या सुप्रसिद्ध संगीतकार जोडीने संगीत दिल आहे. या चित्रपटातील 'डार्लिंग तू', 'ये है प्यार' ही गाणी प्रेक्षकांना कथानकाबद्दल उत्सुकता वाढवण्यात यशस्वी ठरत आहेत.
7 हॉर्स एंटरटेनमेंट प्रा.लि., व्ही.पतके फिल्मस आणि मोशन पिक्चर्सच्या बॅनरअंतर्गत निर्माते अमित धुपे, अजय ठाकूर, व्ही.जे.शलाका आणि निखिल खजिनदार यांनी "डार्लिंग" चित्रपटाची निर्मिती केली आहे.
अश्याच महत्वाच्या अपडेट्ससाठी 'जीवन मराठी' पेजला फॉलो करा.


