Samsung Galaxy A03 Core details.
Samsung ने आत्तापर्यंत अनेक स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता किंमतही भरगोस असते. नवनवीन स्मार्टफोनमध्ये नवनवीन प्रकारचे फीचर्स प्रोव्हाइड करणे हे या कंपनीचे वैशिष्ट्यच आहे.
सध्या या कंपनीने ग्राहकांच्या आग्रहाचा मान ठेवून एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे जो अगदी कमी किंमतीत दमदार फीचर्स देतो. कंपनीने Samsung Galaxy A03 Core हा पॉकेट फ्रेंडली स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कमी बजेट असणाऱ्या ग्राहकांना हा स्मार्टफोन उत्तम पर्याय ठरू शकतो.
Samsung Galaxy A03 Core Specifications:
Samsung ने लॉन्च केलेला हा स्मार्ट फोन अँड्रॉइड गो एडिशन वर काम करतो. या स्मार्टफोन मध्ये ६.५ इंचाचा इन्फिनिटी वी डिस्प्ले सह रीसोल्युशन एचडी + मिळतो. या फोनला २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज दिला आहे. या स्मार्टफोन सोंग बॅक पॅनेल अतिशय जबरदस्त डिझाईन केला आहे ज्यावर ८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे त्याच सोबत फ्लॅश लाईट आहे. व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फी साठी या स्मार्टफोनमध्ये फ्रंटला पाच मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.
Samsung Galaxy A03 Core या फोनमध्ये ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे. इतर फीचर्स पाहता कनेक्टिव्हिटीसाठी 4G LTE, सिंगल बँड WiFi ८०२.११ g, डायरेक्ट WiFi connectivity , ब्लूटूथ वी४.२, ३.५ एमएम हेडफोन जॅक, जीपीएस, चार्जिंग पोर्ट प्रोव्हाइड केले आहेत.
Samsung Galaxy A03 Core price :
लॉन्च झालेल्या तारखे पासूनच या स्मार्ट फोन ला खूप मागणी आली आहे. या स्मार्टफोनची किंमत ७,९९९ रुपये इतकी आहे.
हा स्मार्टफोन तुम्ही ऑनलाईन खरेदी वेबसाईट द्वारे किंवा सॅमसंग ऑनलाइन स्टोअर मधून खरेदी करू शकता.


