Amazon

Ads Area

header ads
header ads

१ जानेवारीपासून Google pay वापरकर्त्यांसाठी हा नवीन नियम लागू होणार. ऑनलाइन ट्रांजेक्शन्स करणे आता अवघड. पहा काय होणार नवीन बदल.

For Goggle Pay Users New Rule from 1 January  :
 आज काल खूप लोक डिजिटल पेमेंटना महत्त्व देत आहेत. हे व्यवहार अधिक सोपे असल्यामुळे लोक ऑनलाइन ट्रांजेक्शन्स करत आहेत. यासाठी अनेक ॲप्स उपलब्ध असून लोकांना डिजिटल वॉलेट द्वारे पैशांची देवाण-घेवाण करता येऊ लागले आहे. यामध्ये गुगल पे( Google pay)  हेसुद्धा उत्तम पर्याय मानले गेले आहे. परंतु गुगल ने त्यांच्या युजर्ससाठी एक मोठी बातमी जाहीर केली आहे. गुगल पे वापरकर्त्यांसाठी नवीन नियम लागू होणार आहेत.

रिझर्व बँक ऑफ इंडियाने(RBI) नवीन मार्गदर्शक तत्वे लागू केले आहेत. ज्याचा परिणाम गुगल(Google) वर सुद्धा झाला आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वे  गुगल पे सह गुगलच्या इतर सेवांवर सुद्धा लागू होणार आहे.


१ जानेवारीपासून हा नवीन नियम लागू होणार -

१ जानेवारीपासून नवीन नियम लागू होणार आहेत. त्या नंतर गुगल युजर्सना अधिक  तत्पर राहणे गरजेचे आहे. कारण गुगल आपल्या ग्राहकांचे सर्व कार्ड तपशिलांचा डेटा सेव्ह करून ठेवणार नाही. आज पर्यंत गुगल आपल्या ग्राहकांच्या पेमेंट्स चे सर्व डिटेल्स म्हणजेच कार्ड नंबर, एक्सपायरी डेट सेव्ह करून ठेवत असे. परंतु यापुढे हे शक्य होणार नाही. नवीन नियम लागू केल्यानंतर गुगल पे युजर्सना व्यवहार करताना त्यांचे कार्ड डिटेल्स पुन्हा एकदा एंटर करावे लागतील. जेव्हा सर्व माहिती पूर्ण होईल तेव्हाच तुम्ही पेमेंट करू शकाल.

हा नियम लागू झाल्यानंतर गुगल पे(Google pay) च्या अनेक वापर करत यांवर याचा परिणाम झटकन दिसून येईल. कारण या नियमावलीनुसार वापरकर्त्यांचे कार्ड डिटेल्स सेव न करता प्रत्येक ट्रांजेक्शन वेळी पुन्हा एकदा डिटेल्स द्यावे लागणार आहे. म्हणजेच तुम्हाला तुमच्या कार्डची एक्सपायरी डेट आणि कार्ड नंबर दोन्ही लक्षात ठेवावे लागेल.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads