Cheapest electric scooter in India :
सध्या इंधनाच्या दरवाढीमुळे भारतीय लोक इलेक्ट्रिक वाहनांना खूप महत्व देत आहे. पेट्रोल डिझेल दरात सतत होणारी वाढ लोकांना सतावत आहे. परंतु इलेक्ट्रिक वाहनांच्या कंपन्यांना याचा मोठाच फायदा होताना दिसत आहे. कारण सध्या भारतीय इलेक्ट्रिक वाहनांना पसंती दाखवत आहेत.
भारतात इलेक्ट्रिक बाइक आणि इलेक्ट्रिक स्कूटर्स ची मागणी वाढत आहे. हिरो या वाहन निर्मित कंपनीने सध्या ग्राहकांना एक मोठी संधी दिली आहे. ज्या मध्ये सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर देण्याचा दावा केला आहे.
हिरो या कंपनीला खूप कमी वेळेत भरपूर लोकांचा प्रतिसाद मिळाला. याच जोरावर हिरो कंपनीने नेहमीच ग्राहकांना अधिकाधिक चांगले सुविधांचे आणि फिचर्स चे वाहने उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.सध्या हिरो कंपनीने नवीन इलेक्ट्रिक लिटर म्हणजे हीरो इलेक्ट्रिक फोटोन (Hero Electric Photon) या नवीन ही बाईक ची निर्मिती केली आहे. जे सर्वात स्वस्त आहे आणि अनेक फीचर्सने ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.
Hero Electric Photon Details :
हीरो इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 76V,26Ah ची बॅटरी दिली जाणार आहे. जी 1200 W मोटर पावर जनरेट करते.
या स्कूटरचा टॉप स्पीड ४२ किलोमीटर प्रति तास असा आहे.
या स्कूटरला चार्ज होण्यासाठी ५ तास लागतात. इतर इलेक्ट्रिक स्कूटर सारखे यामध्ये सुद्धा अनेक फीचर्स समाविष्ट आहेत. यामध्ये कंबाइनड ब्रेकिंग सिस्टिम, चार्जिंग पॉइंट, घड्याळ, स्पीडोमीटर यासारख्या फिचर्स मध्ये नवीन बदल करण्यात आले आहेत. के स्कूटर एकदा चार्ज केल्यास 108 प्रति किलोमीटर धावते.
Hero Electric Photon Price :
हिरो च्या या दोन वेगवेगळ्या स्कूटर ची किंमत वेगवेगळी आहे. या स्कूटरच्या 72LI व्हेरीअंट ची किंमत 61,866 रुपये आहे तर LP व्हेरीअंट ची किंमत 72,990 रुपये असे आहे.


