Amazon

Ads Area

header ads
header ads

Oppo K9s मोबाईल 64 मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेऱ्याश लॉन्च, पहा किंमत आणि फीचर्स

Oppo K9s हा मोबाईल 20th October 2021 रोजी लॉन्च झाला. हा स्मार्टफोन 6.59इंच टचस्क्रीन डिस्प्लेसोबत येतो तर या स्क्रीनचा रिझोल्युशन 1080x2412 पिक्सेल असून 401 पिक्सेल per इंच मिळतात. Oppo K9s स्मार्टफोनमध्ये 6GB RAM मिळतो. Oppo K9s हा स्मार्टफोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टीमसहित येतो. तर या स्मार्टफोनमध्ये 4880mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Oppo K9s Smartphone Photos

ओपो के९एस कॅमेरा स्पेसिफिकेशन

या स्मार्टफोनमध्ये मिळणाऱ्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचं तर,  Oppo K9s स्मार्टफोनच्या बॅकला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो.  यात 64-megapixel प्रायमरी कॅमेरा सेन्सर असून त्याचा अपरेचर f/1.7 आहे; या स्मार्टफोनमध्ये 8-megapixelचा दुसरा कॅमेरा मिळतो ज्याचा अपरेचर f/2.2 आहे. तर तिसरा कॅमेरा हा 2-megapixel आहे  आणि तो f/2.4 aperture सहित येतो. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला असून तो f/2.0 अपरेचर सहित येतो.

Oppo K9s हा स्मार्टफोन ColorOS 11.2 वर आधारित असून यात आपल्याला Android 11 ऑपरेटिंग सिस्टीम मिळते. ओपो K9s मध्ये आपल्याला Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसर मिळतो.


ओपोच्या नवीन मोबाईलमध्ये 128GB इनबिल्ट स्टोरेज मिळणार आहे आणि हा स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येऊ शकतो. Oppo K9s हा ड्युअल सिम स्मार्टफोन असून यात दोन्ही नॅनो सिम बसतात. Oppo K9s ची उंची x रुंदी x जाडी अनुक्रमे  164.43 x 75.88 x 8.52mm  आहे. तर वजन 199 ग्रॅम आहे. Magic Purple Quicksand, Neon Silver Sea, आणि Obsidian Warrior (translated) रंगात हा स्मार्टफोन लॉन्च झाला आहे.

वाचा: Xiaomi New Series: Redmi Note 11 आणि Redmi Note 11 Pro च्या किंमती झाल्या लीक.


Connectivity options in OPPO K9s

कनेक्टिव्हिटी ऑपशन्स बद्दल बोलायचं तर  Oppo K9s या स्मार्टफोनमध्ये Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac/ax, GPS, Bluetooth v5.20, USB OTG, आणि USB Type-C हे ऑप्शन मिळतात. सेन्सरची माहिती द्यायची झाल्यास यात accelerometer, ambient light sensor, compass/ magnetometer, gyroscope, proximity sensor, and fingerprint इतके सेन्सर मिळत आहेत.

वाचा: Mi Smartphone List: एमआयचे सर्व स्मार्टफोन एकाच ठिकाणी, पहा किंमत आणि स्पेसिफिकेशन.


Oppo K9s Price in India

नव्या Oppo K9s ची प्राईस चायनामध्ये CNY 1,499 म्हणजेच सुमारे भारतीय ₹17,500 ही 6GB RAM + 128GB स्टोरेज असलेल्या वेरीएन्ट साठी आहे तर CNY 1,699 म्हणजे  सुमारे भारतीय ₹19,900 इतकी 8GB RAM + 128GB स्टोरेज मॉडेल असलेल्या वेरीएन्ट साठी आहे. चीनमध्ये हा स्मार्टफोन 1 नोव्हेंबर पासून उपलब्ध होणार असून आतापासून प्रिबुकिंग करू शकता. मात्र भारतातील रिलीजबद्दल अजून काही माहिती मिळालेली नाहीय.

वाचा: Sharechat द्वारे कमवू शकता १ लाख रुपये ! तेही अगदी सोप्या पद्धतीने. पण कसे ?.


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads