IPL 2021 आज 14 वा हंगाम नुकताच पार पडला असून Chennai super Kings या टीम ने या हंगामात बाजी मारून चाहत्यांना आनंदी केले आहे. हा हंगाम काही दिवसांपूर्वीच संपला आहे पण सध्याचे खास बातमी म्हणजे BCCI ने पंधराव्या हंगामाला सुरुवात केली आहे.IPL 2022 मध्ये होणाऱ्या सामान्यांच्या तयारीला लागून खेळल्या जाणाऱ्या संघांबद्दल बद्दल एक भन्नाट बातमी सर्वत्र पसरली आहे.
आत्तापर्यंत आयपीएल मध्ये फक्त ८ संघ होते यापुढील हंगामात आणखी २ संघांचा समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच आयपीएल 2022 मध्ये आपल्यांना १० संघ पाहण्यास मिळतील.
T- 20 विश्वचषक सामन्यात Mumbai Indians च्या खेळाडूंमुळे भारताच्या टीमला डोकेदुखी.
पण व्हायरल बातमी कोणती ?
नव्या संघांसाठी अनेक मोठे लोक बोली लावत आहे पण आश्चर्याची बातमी म्हणजे फेमस सुपरस्टार कपल रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण हे दोघे मिळून एक नवीन संघ विकत घेण्याचे ठरवले आहे. अशी बातमी वृत्ताकडून मिळाली आहे.
ही बातमी वाऱ्यासारखी व्हायरल होत असून यावर अनेक विनोदी प्रतिक्रिया नेटकर्यांनी सादर केले आहेत.
BCCI कडून IPLमधील नव्या संघांसाठी टेंडर विकेत घेण्याचा कालावधी २० ऑक्टोबर पर्यंत वाढवून दिला होता. मिळालेल्या माहितीनुसार दोन नव्या फ्रेंचाइजीची प्रत्येकी किंमत ३ हजार ५०० कोटींपेक्षा कमी असणार नाही. २०२२ मध्ये आयपीएलमध्ये दोन नवे संघ उभारण्यासाठी बीसीसीआयची योजना सुरु आहे. या संघासाठी अहमदाबाद, लखनऊ आणि पुणे ही शहर उत्सुक आहेत.
या योजनेतून बीसीसीआयची ७ हजार कोटींची कमाई होऊ शकते. या दोन्ही संघांचे मूल्य २ हजार कोटी इतके ठवले आहे.
नव्या संघाची घोषणा २५ ऑक्टोबर रोजी दुबईत केली जाणार आहे.

