आता कार्तिक महिना(Karthik Civil Month) सुरू झाला असून या महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला करवा चौथ हा सण साजरा केला जातो. करवा चौथ हा सण महिलासाठी महत्वाचा सण आहे. या सणाची वाट महिला वर्षभर पाहत असतात. विवाहित स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून उपवास करतात.
रात्री चंद्राचे दर्शन झाल्यावर पतीसोबत चंद्राला अर्ध्य वाहून पूजा(Karava chauth Pooja) आणि चंद्राचे दर्शन झाल्यानंतर स्रिया पतीच्या हातून पाणी पीत हा उपवास मोडतात. यंदा हा करवा चौथ सण रविवार, 24 ऑक्टोबर रोजी आला आहे. (Karwa Chauth 2021 Date)
महिलांसाठी करवा चौथ व्रत उपवास आहे, मात्र ज्यावेळी महिला आजारी असतील अथवा विशेष परिस्थितीमध्ये पुरुष सुद्धा हे व्रत करू शकतात.
चला तर पाहुयात या लेखात उपवासाशी संबधी असे काही नियम जे प्रत्येक स्त्रीला माहित असावे आवश्यक आहे.
वाचा : Karwa Chauth 2021:का साजरा केला जातो करवा चौथ? चंद्रोदय कधी आहे? (Karwa Chauth Moon time)
करवा चौथ उपवासाचे नियम/ Rules of Karva Chauth fasting/Karwa Chauth Niyama
1. करवा चौथ सणाचा उपवास हा सूर्योदयापासून सुरू होतो. त्यामुळे स्त्रीयांनी सूर्योदयापूर्वी काहीही खाऊ घेऊ शकतात. म्हणून मनात शंका न ठेवता सूर्योदयापूर्वी सार्गी खायला चालेल, यात असलेल्या पौष्टीक तत्वामुळे स्त्रीला उपवास केल्यानंतर दिवसभर ऊर्जा मिळते.(Karwa Chauth Fast)
२. पहिल्या करवा चौथ उपवासावेळी स्त्रीला फळ खाण्यास दिले असेल किंवा पाणी प्यायला मिळाले असेल तर ती स्त्री इतर करवा चौथ उपवासावेळी निर्जल राहू शकते, किंवा फळही खाऊ शकते. मात्र या करवा चौथ व्रतावेळी चंद्रोदयापर्यंत पाणी पिले जात नाही, जर स्त्री आजारी असेल तर ती पाणी घेऊ शकेल.
३. केवळ विवाहित महिलांच नाहीतर ज्या स्त्रियांचे लग्न निश्चित करण्यात आले आहे, त्या स्त्रिया देखील हे व्रत धरू शकतात. मात्र या सणाला अविवाहित स्रिया चंद्र पाहत नाहीत, अश्या स्त्रियांनी तारे पाहून उपवास मोडला पाहिजे.
4. जर स्त्री आजारी असेल तर तिचा पती करवा चौथचा उपवास ठेवू शकतात. असे शास्त्रात म्हंटल आहे.
5. या व्रताच्या दिवशी कथा ऐकणे महत्त्वाचे मानले जाते. करवा चौथ कथा ऐकून विवाहित स्त्रियाच्या घरात सुख, शांती, समृद्धी येते आणि मुलांना सुख मिळते.
6. व्रताच्या दिवशी काळे आणि पांढरे रंग असलेले कपडे घालू नयेत. व पांढऱ्या वस्तू दान करू नयेत. व्रत केलेल्या दिवशी स्त्रियांनी लाल, पिवळा असे चमकदार रंगाचे कपडे घालावेत.
आम्ही करवा चौथ साठी आणखी काही लेख लिहिले आहेत ते तुम्ही नक्की वाचा.
Jeevan Marathi: Karwa Chauth 2021:का साजरा केला जातो करवा चौथ? चंद्रोदय कधी आहे? Information in Marathi.
Jeevan Marathi: karwa chauth 2021:या वर्षीचा करवा चौथ खूप खास आहे पण पूजेच्या शुभ मुहूर्तावर लक्ष द्या.
तळटीप: लिहलेल्या लेखांची कोणत्याही प्रकारची जबाबदारी 'जीवन मराठी' किंवा लिहिणारे, संकलित करणारे घेत नाहीत.


