'फुलपाखरू' या सिरीयल मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली हृता दुर्गुळे आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. हृता आता 'अनन्या' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हृताने आपला इंस्टाग्राम वर या चित्रपटाचा मोशन पोस्ट शेअर करत सर्वांना माहिती दिली. या मोशन पोस्टर वरून ऋता एका दमदार भूमिकेत असल्याचे माहिती होत आहे.
अनन्या हे नाटक रंगमंचावर अफाट यश मिळवल्यानंतर आता चित्रपटाच्या स्वरूपामध्ये आपल्या भेटीस येत आहे. तर हा चित्रपट नायिका केंद्रित असल्याचं या चित्रपटाच्या नावावरून स्पष्ट होत आहे. यामध्ये हृताची भूमिका ही एका दमदार भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे.
हृताने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्टर रिलीज करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,
‘अडथळ्यांना मारून 'लाथ' जी संकटांवर करते 'मात' तीच खरी अनन्या!!!शक्य आहे. तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे! सादर आहे मराठी चित्रपट ‘अनन्या’ चे पहिले ऑफिशिअल मोशन पोस्टर’.
तर हृताच्या या पोस्टवरून आता तिच्या भूमिकेबद्दल बरासा अंदाज प्रेक्षकांना येत आहे तर लेखक-दिग्दर्शक रवी जाधव यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असल्याचं समजतंय रवी जाधव यांचा चित्रपट म्हणजे प्रेक्षक पाहणारच, असं समीकरण असल्याने हा चित्रपट पाहण्यासाठी बरेच चाहते उत्सुक आहेत. तसेच अभिनेत्री हृता दुर्गुळे ला आता चित्रपटांमध्ये पहाणे हे सर्वांची उत्सुकता वाढवत आहे.
हृताने आतापर्यंत टीव्ही मालिकामध्ये तसेच रंगमंचावर काम केल आहे. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सर्व प्रेक्षकांना वेड केला आहे. फुलपाखरू या मालिकेतील वैदही हा रोल तिने केला होता. आजही बरेच चाहते तिला याच नावाने ओळखतात.
अशाच पोस्टसाठी जीवन मराठीला फॉलो, सबस्क्राइब करायला विसरू नका.
हि पोस्ट आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा


