आज बुधवार 18 ऑगस्ट तब्बल चार महिन्यानंतर आज सर्व कंपन्यांनी डिझेल दरात कपात केली असून दुसऱ्या बाजूला पेट्रोलियम कंपन्यांनी आज सलग 32 व्या दिवशी पेट्रोलचा दर स्थिर ठेवला आहे यापूर्वी 17 जुलै २०२१ रोजी पेट्रोल दरात 30 पैसे निवड झाली होती तर डिझेल दरामध्ये 15 जुलै २०२१ रोजी 15 पैशांची वाढ करण्यात आली होती.
💫मुख्य बातम्या -
▪️ सर्व कंपन्यांनी आज बुधवारी डिझेल दरात २० पैशांची कपात केली.
▪️ तब्बल चार महिन्यानंतर डिझेल दरात उपरती झाली.
▪️ पण सलग 32 व्या दिवशीही पेट्रोल दरात स्थिरता.
ग्राहकांना आता लाभ होणार आहे कारण कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत असल्याने पेट्रोलियम कंपन्यांनी डिझेल दरात उपरती करण्याचा निर्णय घेतला आहे कंपन्यांनी आज बुधवारी डिझेल दरात वीस पैशांची कपात करून ग्राहकांना सोयिस्कर केले आहे पण दुसर्या बाजूला पेट्रोल दरांमध्ये स्थिरता ठेवली गेलेली आहे.
दर कपातीमुळे ग्राहकांना किंचित दिलासा मिळेल . covid-19 या काळात सलग तीस दिवस पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंजिनमध्ये स्थिर दर ठेवले होते.
मुंबईमध्ये आज डिझेलचा दर कमी झाल्यावर डिझेलचा भाव ९७.२४ रुपये इतका झाला आहे त्याचप्रमाणे दिल्लीत आज डिझेलचा भाव ८९.६७ रुपये असा आहे.
चेन्नई ९४.२० रुपये आणि कोलकत्यात डिझेलचा भाव ९३.८२ रुपये प्रति लिटर इतका खाली आला आहे.
▫️पाहूया पेट्रोलचा भाव -
आज मुंबई एक लिटर पेट्रोलचा भाव १०७.८३ रुपयांवर असाच कायम आहे तसेच दिल्ली मध्ये १०१.८४ रुपयांवर स्थिर आहे.
गेल्या आठवड्यात शुक्रवारी तमिळनाडू राज्य सरकारने पेट्रोल वरील शुल्क तीन रुपयांनी कमी केले होते त्यामुळे आज चेन्नईत सर्वात कमी दरात पेट्रोल मिळत आहे म्हणजे चेन्नई पेट्रोलचा भाव ९९.४७ रुपये असा आहे तर कोलकत्यात एक लिटर पेट्रोल चे दर १०२.८ रुपयांवर कायम आहे.
जागतिक कमोडिटी बाजारातील कच्च्या तेलाच्या भावात घसरणीमुळे डिझेलच्या दरात झाल्याची बातमी समजत आहे यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे


