सॅमसंगने गॅलेक्सी अनपॅक इव्हेंटमध्ये Samsung Galaxy Buds 2 वायरलेस स्टीरिओ (TWS) इयरफोन लाँच करण्यात आले आहेत. या नव्याने लाँच करण्यात आलेल्या बड्स २ ट्रू वायरलेस स्टीरिओमध्ये नेमके कोणते फीचर्स आहेत ते जाणून घ्या सविस्तर.
हायलाइट्स:
🏷️अनपॅक इव्हेंटमध्ये Samsung Galaxy Buds 2 इयरफोन लाँच
🏷️गॅलेक्सी बड्स 2 मध्ये एएनसी फिचर
🏷️बाजारात २७ ऑगस्टपासून खरेदीसाठी उपलब्ध….
Samsung Galaxy Buds 2 Price
Samsung Galaxy Buds 2 ची किंमत $ १४९.९९ (म्हणजे सुमारे ११,१०० रुपये) आहे. इयरबड्स चार वेगवेगळ्या रंगात येतात - जे ग्रेफाइट, लॅव्हेंडर, ऑलिव्ह आणि व्हाईट आहेत. हे बड्स निवडक मार्केटमध्ये २७ ऑगस्टपासून खरेदीसाठी उपलब्ध होतील. Galaxy Buds 2 ची भारतीय किंमत आणि लाँच तारखेबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही. तर बेसिक सॅमसंग गॅलेक्सी बड्स US मध्ये $ १२९ (अंदाजे ९,६०० रुपये) मध्ये लाँच करण्यात आले आहेत.




