Honor Magic 3 Specifications काय आहेत?
Honor Magic 3 Smartphone मध्ये अँड्राइड 11 OS असून Magic UI ५.० हे UI सिस्टीम मिळणार आहे. होनोर मॅजिक 3 मध्ये 6.67 इंच फुल HD+ ओएलईडी डिस्प्ले मिळणार आहे, या स्क्रीनचा रिझॉल्यूशन 1344x 2772 पिक्सल असून स्क्रीनचा रिफ्रेश रेट 129 हर्ट्ज आहे आणि स्क्रीनचा बॉडी रेशियो ८९ टक्के आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर मिळेल.
Honor Magic 3 Camera बद्दल काय?
Honor Magic 3 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळणार असून यामध्ये 50MP प्रायमरी सेंसर, 64 मेगापिक्सल ब्लॅक अँड व्हाइट सेंसर आणि 13 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस मिळतो. तर सेल्फी साठी समोरील बाजूने 13 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो.
Honor Magic 3 ची बॅटरी किती एमएएच आहे?
Honor Magic 3 मध्ये 4600 एमएएचची बॅटरी मिळणार असून ही बॅटरी 66 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. शिवाय, या डिव्हाइसशी कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ ५.२ व यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळणार आहे.
Honor Magic 3 चे वजन २०३ ग्रॅम आहे.
Honor Magic 3 Pro चे Specifications
Honor Magic 3 Pro याची स्क्रीनसाईज 6.67 इंच मिळणार आहे. स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 888+ प्रोसेसर मिळणार आहे. तर या समार्टफोनचा रॅम 12 GB आहे आणि 512 GB इंटर्नल स्टोरेज मिळणार आहे. या सुद्धा स्मार्टफोनमध्ये 66 W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे, शिवाय, 50 वॉट वायरलेस चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट सुद्धा मिळणार आहे. तर Magic 3 प्रो मध्ये 4600 एमएएचची बॅटरी मिळणार आहे. हा फोन सुद्धा अँड्राइड 11 वर आधारित Magic UI 5.0 वर UI सिस्टीम वर काम करतो.
कॅमेरा आणि कनेक्टिव्हिटी- होनोर मॅजिक 3 प्रो
Honor Magic 3 Pro स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळणार असून 50 MP प्रायमरी सेंसर, 64 MP ब्लॅक अँड व्हाइट सेंसर, 64 मेगापिक्सल पेरिस्कोप लेंस आणि चौथा 13 MP अल्ट्रा वाइड अँगल लेंस मिळणार आहे. समोरील बाजूस 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे. शिवाय वाय-फाय, GPS आणि यूएसबी टाइप-C पोर्ट मिळेल.
Honor Magic 3 Pro+ चे स्पेसिफिकेशन
Honor Magic 3 Pro+ या मॉडेलमध्ये कॅमेरा सोडला तर इतर फीचर्स जवळ जवळ प्रो स्मार्टफोन मॉडेल सारखेच आहेत. या मॉडेलमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50 MP OIS सेंसर आणि तीन 64 MP लेंस मिळणार आहेत. याचा कॅमेरा ३.५ x ऑप्टिकल झूम, 10x हायब्रिज झूम आणि 100x डिजिटल झूम सपोर्ट मिळणार आहे. समोरील बाजूस 13 MP सेल्फी कॅमेरा मिळणार आहे.
Honor Magic 3 series ची Price
Honor Magic 3 - 8 GB + 128 GB स्टोरेज - किंमत ४,५९९ युआन (जवळपास ५२,८०० रुपये)
Honor Magic 3 - 8 GB + 266 GB स्टोरेज - किंमत ४,९९९ युआन (जवळपास ५७,३०० रुपये)
Honor Magic 3 Pro - 8GB + 256 GB स्टोरेज - किंमत ५,९९९ युआन (जवळपास ६८,८०० रुपये)
Honor Magic 3 Pro - 12GB + 512GB स्टोरेज - किंमत ६७९९ युआन (जवळपास ७८,००० रुपये)
Honor Magic 3 Pro+ - 12GB + 512GB स्टोरेज - किंमत ७,९९९ युआन (जवळपास ९१,८०० रुपये)


