Amazon

Ads Area

header ads
header ads

उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश म्हणजेच हिमालय रांगा | Geography Notes For TAIT Exam PDF

भारताची प्राकृतिक रचना अभ्यासत असताना आपल्याला भारतीय प्राकृतिक रचनेचे पाच विभाग अभ्यासावे लागतात.

1. उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश म्हणजेच हिमालय रांगा
2. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश
3. दीपकल्पीय पठारी प्रदेश
4. किनारी मैदानी प्रदेश
5. भारतीय बेटे

उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश म्हणजेच हिमालय रांगा
यामधील आता आपण उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश म्हणजेच हिमालय रांगा याबद्दलची माहिती पाहणार आहोत.

📌हिमालय पर्वताची सरासरी लांबी 2500 किलोमीटर आहे.

📌 तर या हिमालय पर्वताची रुंदी जम्मू-काश्मीर या भागामध्ये 500 किलोमीटर तर अरुणाचल प्रदेश या भागामध्ये दीडशे किलोमीटर आहे.

📌 जम्मू काश्मीर पासून अरुणाचल प्रदेश इतपर्यंत पश्चिम आणि पूर्व दिशेमध्ये हिमालयीन रांगा पसरलेल्या आहेत.

📌 पाच लाख चौरस किलोमीटर इतके क्षेत्रफळ हिमालय याचे आहे.

📌 हिमालय हा सर्वात तरुण आणि वली पर्वत आहे.

उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश म्हणजेच हिमालय रांगा यांच्या बद्दल माहिती पाहत असताना आता आपण लांबी रुंदी आणि कोणत्या दिशेत पसरलेला आहे आणि त्याचे क्षेत्रफळ पाहिले.

आता आपण हिमालयाचे तीन विभाग पडले आहेत ते पाहूयात.

A. मुख्य हिमालय/ हिमाद्री / उत्तर हिमालय

या हिमालयामध्ये सर्वात उंच शिखरे याच भागामध्ये आढळतात.
📌 उंच शिखरांमध्ये माउंट एवरेस्ट, के टू, कांचनगंगा, मकालू, नंगा पर्वत या शिखरांचा समावेश होतो.

📌 हिमालयामध्ये असणारा माउंट एवरेस्ट हा नेपाळ या देशांमध्ये येत असून याची उंची 8848 मीटर आहे.

📌 भारत देशात येणारा के2 या पर्वताची उंची 8,611 मीटर आहे.

📌 तर भारतामध्येच असणारा कांचनगंगा या शिखराची उंची 8,598 मीटर इतकी आहे.

📌 नेपाळ देशात असणारा मकालू या शिखराची उंची 8,481 मीटर इतकी आहे.

📌 तर भारतात असणारा नंगा पर्वत याची उंची 8,126 मीटर इतकी आहे.

📌 या भागात सर्वात उंच सहा हजार मीटर पेक्षा जास्त हिमनद्या आढळतात.

B. हिमाचल/ मध्य हिमालय

📌हिमाचल किंवा मध्ये हिमालय याला लघु हिमालय असे देखील म्हटले जाते. 

📌तर याची सरासरी उंची 3000 ते 4000 मीटर इतकी आहे. या पर्वतांची रुंदी पाहिल्यास सरासरी रुंदी 60 किलोमीटर ते 80 किलोमीटर इतकी आहे.

📌 या पर्वतांमध्ये वृक्ष प्रणाली आढळते.

📌 नैनिताल, दाजिरलींग, मसूरी, सिमला यासारखी थंड हवेचे ठिकाणे या मध्य हिमालय किंवा हिमाचल भागात आहेत.

C. शिवालिक रांगा

📌शिवालिक रांगा या हिमालयामधील सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांगा आहेत. 

📌 शिवालिक रांगाची उंची 1000 ते दीड हजार मीटर इतकी आहे. तर सरासरी रुंदी 15 ते 20 किलोमीटर असून या पर्वतांमध्ये उष्णकटिबंधीय आद्र पानझडी वृक्ष आढळतात.

📌 मध्य हिमालय आणि शिवालिक टेकड्यांच्या दरम्यान गाळाच्या संचयनांमधून तयार झालेली मैदानांची निर्मिती झाली आहे या मैदानांना ड्यून्स असे म्हणतात. म्हणून या भागात असणारे शहरांची नावे देखील डेहराडून, पाटलीडून अशी आहेत.

📌 हिमालयाची विभागणी प्रादेशिक स्थानावरून सर सिडने बेरॉड यांनी केली आहे.

या भागात आपण उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशांचा म्हणजेच हिमालय रांगांचा अभ्यास केला यामध्ये हिमाद्री म्हणजेच मुख्य हिमालय, हिमाचल म्हणजेच मध्य हिमालय, आणि शिवालिक रांगा यांचा अभ्यास केला.


पुढचा भाग उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हे वाचण्यासाठी किंवा अभ्यासण्यासाठी येथे क्लिक करा.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads