हिंदी ,कन्नड, तामिळ, मल्याळम या सारख्या भाषांमधून पुष्पा या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.
चित्रपट बघितलेल्या प्रेक्षकांकडून या चित्रपटाची आगळी वेगळी असणारी खासियत कळत आहे.
पण या चित्रपटाची नेमकी कथा काय आहे हे सर्वांनाच जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे.
चला तर मग पाहूया पुष्पा या चित्रपटा मध्ये नेमके आहे तरी काय...
पुष्पा या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. नवीन येरनेनी आणि वायू. रवि शंकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.
डोंगराळ भागातील शेषाचलम या खूप मोठ्या प्रमाणात पुष्पा राज च्या भूमिकेत अल्लू अर्जुन लाल चंदनाची तस्करी करत असतो. त्याला नेहमीच ज्या तस्करी प्रवासात खूप मोठे यश मिळावे असे वाटत असते. पण नेहमीप्रमाणे मूव्हीमध्ये विलन असतोच. मंगलम सिंधू या डॉन अशी त्याला सामना करावा लागतो. त्यानंतर पुष्पा राज हा खूप मोठा तस्कर बनतो. परंतु सिनेमामध्ये येथे मोठा ट्विस्ट आहे. पहिला विलन चा त्रास संपताच पुष्पा राजासमोर नवीन संकट येते. तेथील वनाधिकारी शिकावत हा पुष्पा राजला तीव्र विरोध करतो. शिकावतच्या जाळ्यात न अडकता पुष्पा राज पुन्हा एकदा जिंकतो. या संपूर्ण प्रवासाची कथा या सिनेमाद्वारे दाखवण्यात आली आहे.
रश्मिका मंदान्ना ही पुष्पा राज ची प्रेयसी आहे. जी
श्रीवल्ली गावात राहात असून 'बनी' असे तिचे नाव आहे.
या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुन सह फहद फासिल, राव रमेश, अनसूया भारद्वाज, धनंजय, रश्मिका , अजय घोष यासारखे दिग्गज कलाकार सामील आहेत.


