Amazon

Ads Area

header ads
header ads

उत्तर भारतीय मैदानी प्रदेश | TAIT Bhugol Notes PDF Download

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच TAIT या परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला भारताचे प्राकृतिक रचना अभ्यासावी लागते यामध्ये भूरचना अभ्यासत असताना पर्वतीय प्रदेशांचा आपण मागील भागात अभ्यास केला. आता आपण उत्तर भारतीय मैदानी प्रदेशांचा थोडक्यात आढावा घेऊयात.
उत्तर भारतीय मैदानी प्रदेश

📌 उत्तर भारतात असणाऱ्या मैदानी प्रदेशाची लांबी 2400 km आहे. तर या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाची रुंदी पश्चिमेकडे 320 km आणि पूर्वेकडे 240 किलोमीटर आहे.

📌 उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाची खोली 1000 ते 2000 मीटर आहे.

📌 भारत देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या दृष्टीने 1/3 भूभाग हा उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाने व्यापला आहे. 

📌 या व्यापलेल्या भागांमध्ये भारत देशाची एकूण लोकसंख्येच्या 40% लोकसंख्या या भागात राहते.

📌 उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे क्षेत्रफळ सात लाख चौरस किलोमीटर आहे तर हे मैदानी प्रदेश समुद्रसपाटीपासून सरासरी 200 मीटर उंच आहेत. 
📌 यामध्ये नवीन गाळाचे मैदान आणि जुन्या गाळाचे मैदान असे प्रकार आहेत.

📌 नवीन गाळाच्या मैदानी प्रदेशास खादर असे म्हणतात. भांगर असे नाव जुन्या काळाच्या मैदानी प्रदेशाला देण्यात आले आहे.

📌 पंखाच्या आकाराची दगड गोटे वाळू यापासून तयार झालेल्या हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या गाळाच्या मैदानाला भाबर असे म्हटले जाते.

📌 भाबर याच्या दक्षिण भागांमध्ये बारीक मातीचे संचयन दलदल आणि दाट जंगले आहेत याला तराई असे म्हटले जाते.

📌 अवध किंवा अयोध्येचे मैदान हे घागरा नदीच्या मैदानी प्रदेशाला म्हणतात. 

📌 रोहील खंडाचे मैदान असे नाव गंगा यमुना यांच्या दरम्यानच्या मैदानी प्रदेशाला आहे.

📌 तर गंगा आणि यमुना या दोन नद्यांमधील प्रदेश दुआब या नावाने ओळखले जात

उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात तीन भाग पाडले जाऊ शकतात.

📝 ब्रह्मपुत्राच्या मैदानी भागाचा समावेश पूर्व मैदानी प्रदेश यामध्ये केला जातो.
📝 गंगा आणि यमुना नदीच्या भागातील मैदानी प्रदेशाचा समावेश मध्य मैदानी प्रदेश यामध्ये होतो. या मैदानी भागांमध्ये भाबर तराई हा भाग दिसून येतो.
📝 सिंधू सतलज नदीच्या मैदानी प्रदेशाचा समावेश पश्चिम मैदानी प्रदेश यामध्ये होतो. भारतीय वाळवंटाचा भाग हा देखील या मैदानी प्रदेशांमध्ये आढळून येतो. या प्रदेशामध्ये दुआब यांची संख्या जास्त आहे.

शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेचा अभ्यास करत असताना भूगोल या विषयांमध्ये भारतीय प्राकृतिक रचनेविषयी आपण अभ्यास करत आहोत यामध्ये आज आपण उत्तर भारतीय मैदानी प्रदेश याबद्दल माहिती घेतली.


पुढे आपण दीपकल्पीय पठारी प्रदेश याबद्दल माहिती घेऊयात.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads