सध्या मालिकेत परांजपे वकील आणि नेहा यांचे लग्न ठरले आहे. या लग्नास नेहा फारशी उत्सुक नसली तरी परांजपे वकील अगदी आनंदात आहे. परंतु हे लग्न होईल का? खरंच नेहा परांजपे वकिलांसोबत संसार करेल का? हे प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत.
यातच एक नवा ट्विस्ट म्हणजे यशला परांजपे वकीलांबाबतचे सर्व सत्य कळणार आहे. त्यांनी केलेली कटकारस्थाने आणि लग्ना मागचा विशेष हेतू यशला समजल्याने तो परांजपे वकिलांची चांगलीच धुलाई करीत आहे असे फोटोज झी मराठी ने इंस्टाग्राम वर पोस्ट केले आहेत. नेहाची वहिणी सुद्धा परांजपे यांच्या डावात सामील होती हेसुद्धा यशला कळणार आहे. रागाच्या भरात यश परांजपे वकिलावर हात उचलून त्यांना खूप मारताना दिसत आहे. हे सर्व पाहुन नेहा गोंधळात पडली आहे. या सर्व घटनेवर नेहाची पुढची प्रतिक्रिया काय असेल याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. नेहा लग्नाला तयार होईल का? यशचे नेहावर असलेले खरे प्रेम कबूल करू शकेल का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढील काही भागात पाहायला मिळतील.
यासारख्या अनेक मनोरंजक गोष्टी वाचण्यासाठी जीवन मराठीशी कनेक्ट व्हा, पेजला फॉलो करा.


