पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे बॅटरी रेंजच्या कार ना भरपूर डिमांड दिला जात आहे. आत्तापर्यंत अनेक बॅटरी बेसड कार मार्केटात उपलब्ध आहेत.
चीन मध्ये सुप्रसिद्ध असलेली इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपनी निओ (Nio) ने नवीन इलेक्ट्रिक कार Nio ET5 लॉन्च केली आहे. जे ग्राहकांचे अत्यंत आवडीचे इलेक्ट्रिक कार ठरले आहे. कारण फीचर्स आणि कार स्पीड जबरदस्त तर आहेच परंतु ग्राहकांना परवडणारे हे इलेक्ट्रिक कार आहे.
या इलेक्ट्रिक कार मुख्य वैशिष्ट्य म्हणजे याची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर ही कार १००० किलोमीटर धाव घेते. असा कंपनीचा दावा आहे.
चला तर मग अधिक जाणून घेऊया ...
Nio ET5 फीचर्स (features):
Nio ET5 या इलेक्ट्रिक कार चे अनेक ऑप्शन्स उपलब्ध केले गेले आहेत. ज्यामध्ये 75 kWh बॅटरीची रेंज 550 किलोमीटर, 100 kWh बॅटरीची रेंज 700 किलोमीटर आणि 150 kWh बॅटरीची रेंज सिंगल चार्जवर १ हजार किलोमीटरपर्यंत धाव घेत असल्याचा कंपनीने दावा केला आहे. ही कार इलेक्ट्रिक असली तरी याचा टॉप स्पीड जबरदस्त आहे.
निओ ईटी ५ चे अनेक खास फीचर्स आहेत. त्यामध्ये कनेक्टेड कार टेक्नोलॉजी( connected car technology), पॅना सिनेमा , इंटिग्रेटेड ऑगमेंटेड रियलिटी( integrated augmented reality) आणि व्हर्च्युअल रियलिटी virtual reality एंबिएंट लायटनिंग (ambiant lightning) त्याचबरोबर डॉल्बी एटमॉस सराउंड सिस्टम ( dolby atmos surround system) हे सर्व फीचर्स समाविष्ट केले गेले आहेत.
Nio ET5 चे किंमत (price) :
Nio ही चीन मधील अत्यंत नामवंत कंपनी आहे.
Nio ET5 इलेक्ट्रिक कारला चीनमध्ये ३९, ०३, २६४ यूआन या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. याची किंमत इंडियन करन्सी मध्ये पाहता ३९ लाख रुपयांहून जास्त होते. परंतु चीन मध्ये कोणतीही सरकारी सबसिडी उपलब्ध करून दिली नाही. आपल्या भारतात सबसिडीमुळे या कार ला ग्राहकांना यापेक्षा कमी किमतीत खरेदी करता येऊ शकते.


