स्मार्टफोन्स वेव फ्रिक्वेन्सीवर चालतात. त्यामुळे त्यातून रेडिएशनचं बाहेर पडतात. काही असे स्मार्टफोन आहेत, ज्यातून सर्वाधिक रेडिएशनचं उत्सर्जन होतं. हे उत्सर्जित रेडिएशन आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतात. त्यामुळेच अनेक कंपन्यांनी स्मार्टफोनची चाचणी करताना त्याकडे विशेष लक्ष देतात. तरीसुद्धा असे खायचे हे स्मार्टफोन्स आहेत ज्यातून अतिरिक्त प्रमाणात बाहेर पडतात आणि त्यामुळे आपल्या डोळ्याला धोका होऊ शकतो. तर मग तुमचा स्मार्टफोन त्यामधला तर नाही ना ?
जर्मनीची संस्था द फेडरल ऑफिस फॉर रेडिएशन प्रोटेक्शन मेन्टेन्स ( the federal office for radiation protection maintenance ) दरवर्षी सर्वाधिक रेडिएशन उत्सर्जित करणाऱ्या स्मार्टफोनची लिस्ट प्रसिद्ध करते.
◾या लिस्ट प्रमाणे पहिल्या क्रमांकावर Motorola Edge चं नाव आहे. या स्मार्टफोन मधून 1.79 वॅट/किलोग्रॅम रेडिएशन उत्सर्जित होतं.
◾या लिस्टमधील दुसरा फोन Oneplus 6T आहे. या फोनमधून 1.55 वॅट/किलोग्रॅम रेडिएशन उत्सर्जित होतं.तिसरा सर्वाधिक रेडिएशन उत्सर्जित करणारा स्मार्टफोन ZTE Axon 11 5G असल्याचं स्पष्ट करण्यात आला आहे.
◾ अतिशय रेडिएशन बाहेर सोडणाऱ्या स्मार्टफोनच्या लिस्टमध्ये चौथ्या क्रमांकावर Google Pixel 4a स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन 1.37 वॅट/किलोग्रॅम रेडिएशन उत्सर्जित करतो.
◾पाचवा सर्वात जास्त रेडिएशन उत्सर्जित करणारा स्मार्टफोन Oppo Reno 5G असल्याचं या संस्थेद्वारे सांगण्यात आलं आहे. Oppo च्या फोनमधून 1.36 वॅट/किलोग्रॅम रेडिएशन उत्सर्जित होते असे त्या लिस्ट मध्ये स्पष्ट केले आहे.


