वेगवेगळ्या कार्यक्रमात, सणासुदीला आपला फोटो चांगला दिसावा असे प्रत्येकाला वाटते. चांगल्या फोटोंसाठी कॅमेऱ्यासोबतच चांगल्या सॉफ्टवेअर प्रोसेसिंगचीही गरज असते. अनेक फिल्टर वापरून तुम्ही फोटो आणखी चांगला बनवू शकता. आम्ही तुम्हाला अशाच 5 Camera Apps बद्दल माहिती देणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा फोटो अधिक छान बनवू शकता.
🔹 Open Camera : हे एक Android base कॅमेरा ॲप मधील सर्वात बेस्ट मानले जाते. या ॲप मध्ये मॅन्युअल मोड( manual mode) ऑटो लेव्हल (auto level) आणि व्हॉईस काउंटडाउन (voice countdown) सारखी वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय, त्यात अनेक ग्रिडही उपलब्ध आहेत., तुम्हाला ऑन-स्क्रीन हिस्टोग्राम, फोकस पिकिंग यांसारखी फीचर मिळतात. त्याचा मॅन्युअल मोडमुळे अधिक चांगले फोटो आपण या ॲपद्वारे काढू शकतो.
🔹Retrica : या ॲप मध्ये 190 फिल्टर्स युजर्सना उपलब्ध करून दिले आहेत. या ॲपचे खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ब्लर आणि ग्रेनचा विशेष समावेश आहे. याच सोबत क्रिएटिव्ह इफेक्ट्स देण्यात आले आहे.
🔹Cycamera : इनबिल्ट एडिटर (inbilt editor), ब्युटी फिचर ( buety feacher),बॉडी एडिटर ( body editor)यासारखे अनेक दमदार फीचर्स या आत मध्ये प्रोव्हाइड केले जातात. यामध्ये तुम्हाला हवा तसा फोटो एडिट करू शकता.
🔹Camera 360 : या ॲपचा वापर करून तुम्ही तुमच्या फोटोवर वेगवेगळ्या स्टिकर्स इमोजीस ऍड करू शकता. यामध्ये अनेक कार्टून लेअर दिले आहेत. याशिवाय मेकअप आणि ब्युटी फिल्टर्स उपलब्ध करून दिले आहेत.
🔹 Panorama 360 : तुम्हाला एकाच फ्रेम मध्ये मोठा फोटो काढायचा असेल तर तुम्ही या ॲप द्वारे खूप सोप्या पद्धतीने काढू शकता. यामध्ये पॅनोरमा शुटींग मोड उपलब्ध आहे. यामध्ये अनेक प्रकारचे टॅग दिले आहेत.
तर मित्रांनो या प्रकारच्या कॅमेरा ॲप्स चा वापर करून तुम्ही तुमचा फोटो अधिक चांगला काढू शकाल.


