Amazon

Ads Area

header ads
header ads

SBI चे कार्ड वापरणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी! १ डिसेंबर पासून मोजावे लागतील एवढे अधिक पैसे | हा नवीन नियम लागू होणार.

जीवन मराठी: सध्याच्या काळात बँकांना खूप महत्त्व दिले जाते. आता जागोजागी अनेक बँका उभारलेल्या दिसतात. त्यापैकी एक महत्वाची बँक State Bank of India (SBI ) आहे. ही बँक ग्राहकांना नेहमीच वेगवेगळ्या सुविधा त्याप्रमाणे सेफ्टी याची गॅरंटी देते. पण जर तुम्ही एसबीआयचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास ठरेल. चला तर मग सांगून घेऊया नक्की बातमी काय?


 1 डिसेंबर पासून स्टेट बँक ऑफ इंडिया ने एक नवीन बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने त्यांच्या कार्ड साठी एक नवीन नियम लागू करणार आहे. तुम्हीSBI चे क्रेडीट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला त्याचे एक्स्ट्रा पैसे भरावे लागणार आहेत. क्रेडिट कार्ड द्वारे केलेल्या व्यवहारांसाठी अधिक पैसे मोजावे लागतील. SBI कार्ड आणि पेमेंट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड यांनी दिलेल्या माहितीनुसार हा कर आकारला आहे. क्रेडिट कार्ड च्या EMI द्वारे व्यवहार करण्यात येणाऱ्या  सर्व ट्रांजेक्शन वर ९९ रुपये भरावे लागणार आहे. 1 डिसेंबर पासून हा नियम लागू होत असल्याचे सांगितले जात आहे.

ऑनलाइन शॉपिंग किंवा शॉपिंग यासाठी आपण क्रेडिट कार्ड EMI चा वापर करतो पण यासाठी आपल्याला आता 99 रुपये मोजावे लागणार आहेत. 99 रुपये की प्रोसेसिंग फी असल्याचे म्हंटले आहे. पण तुमचे ट्रांजेक्शन झाले नसेल किंवा प्रोसेस कम्प्लीट नसेल तर हे  99 रुपये आकारण्यात येणार नाही. अशी माहिती देण्यात आली आहे.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads