Amazon

Ads Area

header ads
header ads

'येऊ कशी तशी मी नांदायला 'मधील ओम ची आई शकू ( शुभांगी गोखले) यांनी मालिकेचा घेतला निरोप| त्याऐवजी 'ही'सुप्रसिद्ध अभिनेत्री दिसणार . पण मालिका सोडण्याचे कारण काय?| Marathi updates

जीवन मराठी: झी मराठी वरील अवघ्याच दिवसात प्रेक्षकांच्या मनावर ताबा मिळवलेली मालिका येऊ कशी तशी मी नांदायला. या मालिकेत अनुभवी कलाकार सोबतचं  नवीन आलेले कलाकार सुद्धा अगदी गोडीने काम करतात.  या मालिकेमध्ये वजनदार स्वीटू आणि नटखट ओम यांची जोडी हिट ठरली आहे. पण या कुटुंबातील एक व्यक्ती मालिकेचा निरोप घेणार असल्याचे बातमी समोर आले आहे. पण ती व्यक्ती कोण? मालिका सोडण्याचे कारण काय? चला तर पाहूया मालिकेने कोणत्या व्यक्तीस निरोप दिला.

'येऊ कशी कशी मी नांदायला' मालिका वेळोवेळी प्रेक्षकांकडून ट्रोल केली गेली. पण मालिकेचा चाहतावर्ग खूपच मोठा आहे. त्यामुळे सर्वच प्रेक्षकांनी मालिकेला भरभरून प्रेम दिलं.
    या मालिकेत ओमच्या  आईची भूमिका साकारणारी शकू म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले मालिके चा निरोप घेणार असल्याचे समजले आहे. मालिका सोडण्याचा नेमकं कारण काय हे अजून कळाले नाही. त्याऐवजी आपणास एक सुप्रसिद्ध अभिनेत्री भेटीस येणार आहे.  ओमची आई शकू म्हणजेच शुभांगी यांनी खूप मनापासून काम केलं. त्यामुळे त्यांचा चाहता वर्गही खूप वाढला आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात त्यांना सर्वोत्कृष्ट सासुबाई असा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. पण काही कारणास्तव त्यांना ही मालिका सोडावी लागत आहे. त्याऐवजी अभिनेत्री किशोरी अंबिये मालिकेत दिसणार आहेत.


मालिका सोडण्याचं नेमके कारण काय?

शुभांगी गोखले यांनी मालिकेचा निरोप घेण्यामागील खरं कारण स्पष्ट झालं नसलं तरी या मालिकेच्या कथेचा खालावलेला दर्जा आणि त्यांच्यावर चित्रित होणारा कमी भाग यामुळे त्यांनी ही मालिका सोडल्याचं  कारण दिले जात आहे . 'राजा राणीची गं जोडी' या मालिकेत देखील शुभांगी यांची गरज असल्याने त्यांनी हा निर्णय घेतलं असावं.



हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads