IPL 2022 च्या हंगामासाठी वेगवेगळे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. म्हणूनच त्यापूर्वी मेगा लिलाव होणार आहे. त्यासाठी फक्त काही खेळाडू लिलावात उतरणार आहेत. त्यादरम्यान चेन्नई सुपर किंग्स चे कर्णधार महेंद्रसिंग धोनी या संघात रिटेन करणार आहेत असे समजले आहे. एक बातमी सर्वांसमोर उलगडली त्यामुळे चाहत्यांचा खूपच मोठा गोंधळ उडाला आहे .
महेंद्रसिंग धोनी यांनी असे म्हटले की," चेन्नईने माझ्यावर पैसा वाया घालू नये" या वाक्याचा प्रेक्षकांना काहीसा अर्थ समजला नाही. एन श्रीनिवासन हे सी एस के चे मालक असून यांनी धोनीने असे म्हटले असे सांगितले आहे.
एन श्रीनिवासन एका वृत्तसंस्थेशी बोलताना असे म्हणाले की, "धोनी एक निपक्ष व्यक्ती आहे. त्याला सोबत कायम ठेवण्यासाठी या संघाने जास्त पैसा खर्च करावा असे त्याला अजिबात वाटत नाही .यामुळे संघाने रिटेन करावे असे त्याला वाटत नाही, हे सर्व जरी खरे असले तरी पुढच्या हंगामात सुद्धा महेंद्रसिंग धोनी हेच चेन्नई सुपर किंग्स चे कर्णधार असावे अशी माझी मनापासून इच्छा आहे".


