Amazon

Ads Area

header ads
header ads

निलेश साबळे यांनी हात जोडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मागितली माफी! पहा नेमके घडले काय?| Chala hava yeu dya

जीवन मराठी: झी मराठीवरील चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम आज घराघरात पोहोचला आहे. मनोरंजन हा केवळ मुख्य हेतू नसून त्या कार्यक्रमात द्वारे मिळणाऱ्या अनेक संदेश लोकांना खूप काही शिकवून जातात. या कार्यक्रमाद्वारे अनेक मराठी हिंदी सिनेमांचे नाटकांचे प्रमोशन केले जाते. या कार्यक्रमात मोठमोठे कलाकार सुद्धा सहभागी या कार्यक्रमाचा  मुख्य सेतु म्हणजे लोकांना हसवणे हा आहे. म्हणूनच काही वेळेस वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत कलाकार, दिग्दर्शक, नाटककार यासोबतच काही राजकारणीय लोकांवर विनोदी टीका केले जातात.  कार्यक्रमाद्वारे काही लोकांना ट्रोल केले जाते. असे काही प्रेक्षकांचे म्हणणे आहे. 

दिवाळी अधिवेशनात 'चला हवा येऊ द्या 'चा एपिसोड प्रसारीत करण्यात आला होता त्यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांचे पात्र साकारताना त्यांचा अपमान होईल असे दृश्य दाखवण्यात आले होते असे काही कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. म्हणून चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचे दिग्दर्शक त्याचप्रमाणे सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची माफी मागितली. हा कार्यक्रम प्रसारित झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी सतत फोन करून साबळे यांना माफीची मागणी केली होती. यामुळे हे प्रकरण अधिक चिघळू नये किंवा याचा गैर अर्थ होऊ नये. म्हणून निलेश साबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नारायण राणे यांच्या घरी जाऊन भेटले. तसेच पाया पडून, हात जोडून मनापासून माफी मागितली.


नारायण राणे हे आमचे आदर्श व्यक्तिमत्व असून त्यांचा कलाकारांनी वेळोवेळी सन्मान केला आहे. परंतु या झालेल्या प्रकरणी मनापासून माफी द्यावी. यापुढे अशी कोणतीच चूक आमच्या टीम कडून होणार नाही असे निलेश साबळे म्हणाले असे राणे समर्थकांनी माहिती दिलेली आहे.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads