Amazon

Ads Area

header ads
header ads

IPL 2022 मधील नवीन संघासाठी 'या' महत्त्वाच्या खेळाडूवर लागू शकते 20 कोटींची बोली! कोण आहे हा खेळाडू?

जीवन मराठी:  काही दिवसांपूर्वीच IPL चा १४ वा हंगाम पार पडला. आता सर्वजण पुढच्या वर्षीच्या  अर्थात १५ व्या हंगामाच्या तयारीसाठी सुरुवात केली आहे. 
पुढील वर्षी येणाऱ्या पंधराव्या हंगामात 10 संघांमध्ये आयपीएल सामन्यांचे आयोजन केले आहे. सध्या IPL  मध्ये फक्त ८ संघ असत होते पण पुढील वर्षातील सामन्यांमध्ये दोन नवे संघ हंगामात उतरणार आहेत.
पुढील वर्षाच्या सामन्यांसाठी पुन्हा एकदा एक जोरदार बोली लागणार आहे. त्याआधी काही खेळाडूंना प्रत्येक संघ रिटेन करेल. नवीन येणारे संघ म्हणजेच अहमदाबाद आणि लखनऊ या संघांसाठी काही चांगले खेळाडू निवडायचे असल्यामुळे आता ही बोली किती मोठी लागणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

आयपीएलच्या पंधराव्या मोसमात  दोन संघ   नव्याने तयार होत असल्याने BCCI ने मेगा ऑक्शन चे आयोजन केले आहे. त्यामुळे  काही भारतीय आणि विदेशी खेळाडूंच्या नियमात ही बदल होण्याची शक्यता आहे. 

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि सुप्रसिद्ध कमेंटेटर आकाश चोप्रा यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करताना एक महत्वाची बातमी दिली आहे. आकाश चोप्रा यांनी यांनी ट्विट केले की जर के एल राहुल मेगा ऑक्शन मध्ये गेला आणि जर एखाद्या खेळाडूचा पगार ड्राफ्ट सिस्टीम मध्ये निश्चित केला गेला नाही. तर के. एल. राहुल हा मेघा ऑप्शन मधून सिलेक्ट झालेला सर्वात महागडा खेळाडू ठरू शकेल. त्याला २० कोटी किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीची बोली लागू शकते असे त्यांचे मत आहे.

सध्या आयपीएलच्या १४ व्या हंगामात के .एल.राहुल हा पंजाब तर्फे एक जबरदस्त आणि शानदार खेळाडू ठरला असून त्याची कामगिरी फार उत्तम होती. त्याच्या फलंदाजी पुढे मोठमोठे खेळाडूही फिके पडतात. राहुल कर्णधार पदाची जबाबदारीही उत्तम सांभाळू शकतो त्यामुळे लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नवीन फ्रांचायझी आयपीएल  मेगा ऑक्शन मध्ये त्याला एन्ट्री देऊ शकतात.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads