Amazon

Ads Area

header ads
header ads

Xiaomi New Series: Redmi Note 11 आणि Redmi Note 11 Pro च्या किंमती झाल्या लीक

Redmi Note 11 Series:
चीनची सर्वात पॉप्युलर मोबाईल निर्मिती कंपनी Xiaomi आपली नवीन Redmi Note 11 सीरीज लवकरच लॉन्च करू शकते. या सिरिजच्या अंतर्गत Redmi Note 11 आणि Redmi Note 11 Pro  हे दोन स्मार्टफोन बाजारात येऊ शकतात. काही रिपोर्टनुसार असं मानलं जात आहे की हे दोन स्मार्टफोन पुढील महिन्यात लॉन्च होऊ शकतात तर रेडमी नोट 11 मध्ये MediaTek Dimensity 810 प्रोसेसर देण्यात येणार असून सोबत यामध्ये 5000mAh बॅटरी देण्यात येऊ शकते. दरम्यान या स्मार्टफोन लॉन्च होण्याआधी त्याच्या किंमती समोर आल्या आहेत.
Redmi Note 11 ची किंमत असू शकते एवढी?

Redmi Note 11 या स्मार्टफोनला कंपनी दोन व्हेरियंट मध्ये लॉन्च करू शकेल त्यामध्ये एक असेल तर 6 जीबी रॅम वाला आणि त्याची इंटरनल स्टोरेज क्षमता 128 जीबी असू शकेल. तर याची संभावित किंमत 1199 युवान म्हणजेच जवळपास 14 हजार रुपये असू शकते.
 तर दुसऱ्या बिर्याणी ची किंमत 1599 युवान म्हणजे सुमारे 18 हजार पाचशे रुपये असू शकते तरी यामध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इनबिल्ट मेमरी मिळू शकते.


Redmi Note 11 Pro ची किंमत असू शकते एवढी?

Redmi Note 11 Pro या स्मार्टफोनला शाओमी तीन वेरीएन्ट मध्ये लॉन्च करू शकते तर यामध्ये 6 जीबी रॅम 128 जीबी स्टोरेज असलेल्या मोबाईलची किंमत 1599 युवान म्हणजेच जवळपास 18500 रुपये इतकी किंमत असू शकेल तर 8 जीबी रॅम आणि 128 जीबी मेमरी असलेल्या वेरीएन्टची किंमत 1799 युवान म्हणजे जवळपास 20 हजार 900 रुपये एवढे असू शकेल अशी माहिती मिळत आहे. तर आठ जीबी रॅम आणि इंटरनल मेमरी 256 जीबी असलेल्या वेरीएन्टची किंमत सुमारे 1999 युवान म्हणजेच 23 हजार 300 रुपये त्यात जवळपास असू शकेल.

Redmi Note 11 Pro Features & Specifications

Xiaomi च्या Redmi Note 11 स्मार्टफोनचा डिस्प्ले  120Hz रिफ्रेश रेट सोबत दिला जाऊ शकतो. चांगल्या परफॉर्मन्ससाठी MediaTek Dimensity 810 प्रोसेसर चा उपयोग या स्मार्टफोनमध्ये केला जाऊ शकतो. तर फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात येणार असल्याची बातमी मिळत आहे. तर फ्रंट कॅमेरा हा 13 मेगापिक्सल असणार आहे अशी लीकमध्ये माहिती मिळत आहे तर 5000mAh ची बॅटरी मिळू शकते जी 33W चार्जिंगला सपोर्ट करेल.


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads