लवकरच झी मराठीवर एक अनोखा कार्यक्रम होणार आहे. प्रेक्षक त्या कार्यक्रमाचे खुपच आतुरतेने वाट पाहत आहेत. मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे 'झी मराठी अवॉर्डस' .कलाकारांच्या गुणांना प्रोत्साहन देणारा हा कार्यक्रम सर्वांनाच हवाहवासा आहे. या कार्यक्रमाला यावर्षी नवीन काहीतरी पाहायला मिळणार आहे असे समजले आहे.
गेली १७ वर्षे महाराष्ट्राचे मानाचे वस्त्र पैठणी देऊन सर्वांचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांनी होम मिनिस्टर कार्यक्रम द्वारे अनेक सौभाग्यवतींचा सन्मान केला. हा कार्यक्रम महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात बघितला जातो.या कार्यक्रमासाठी आदेश बांदेकर यांनी खूप प्रवास करून अनेक बहिणींना पैठणी देऊन त्यांचा गौरव केला.
पण एक भन्नाट बातमी आपल्यास मिळाली आहे की,
आदेश बांदेकर यांनी चक्क सुप्रसिद्ध आणि सर्वांची लाडकी अभिनेत्री कतरीना कैफला पैठणी देऊन सन्मान केला.
सध्या विकी कौशल आणि कतरिना यांच्या साखरपुड्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे . त्यात आदेश बांदेकर यांनी कतरिनाला पैठणी दिल्यामुळे ही बातमी वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे.
कतरिना कैफ ही झी मराठी अवॉर्ड्स या सोहळ्यात आनंदाने सहभागी होऊन खूप मज्जा केल्याचे दिसत आहे. भाऊ कदम सोबत अनेक विनोदी गप्पा मारण्याचे फोटो व्हायरल होत आहेत.


