Amazon

Ads Area

header ads
header ads

truecaller चे हे फीचर्स तुम्ही वापरला नसाल? पहा कोणते Features

आपण नेहमी Spam कॉल आणि सेव नसलेल्या नंबरचे नाव शोधण्यासाठी ट्रू कॉलर या अँपचा वापर करतो. पण तुम्हाला माहीत आहे का या अँप मध्ये असे बरेच फीचर्स आहेत जे आपणास माहीत नाहीत मात्र आपल्यासाठी खूप उपयुक्त आहेत. चला तर या आर्टिकल मध्ये पाहुयात अशी काही फीचर्स जे हे अँप वापरताना उपयुक्त होतील. 
कॉल रिजन 
Trucaller या अँप मध्ये हे फीचर्स अलीकडेच देण्यात आले आहे. Call reason या फिचरचा उपयोग करून आपण कॉल करण्याऱ्या व्यक्तीस सूचित करू शकतो की आपण का कॉल केलो आहे.त्यामुळे पुढील व्यक्ती जीला आपण कॉल केलो आहे त्या व्यक्तीस कॉल चे कारण कळेल आणि ती व्यक्ती जरी कामात असेल तर महत्वाचा कॉल असल्याचे कळेल आणि कॉल उचलेल. हे फिचर ios आणि अँड्रॉइड या दोन्ही युजर्सला उपलब्ध आहे.


स्पॅम स्टॅटिस्टिक
मोबाईल वर येणारे स्पॅम कॉल आणि SMS लक्षात घेऊन Truecaller त्यांच्या या अँपवर Spam Statistics हे फिचर दिले आहे. या फिचरच्या उपयोगाने नाव आणि आकडेवारीच्या मदतीने त्या नंबर बद्दल जाणून घेता येते असा एक मार्ग विकसित केला आहे. या फिचर द्वारे आलेल्या स्पॅम कॉलच्या नावाखाली किती जणांनी स्पॅम मार्क केलं आहे, त्यांनी किती कॉल केले आहेत अशी सर्व माहिती दिली जाते. याच्या उपयोगाने फोन उचलणारा लक्षात घेऊ शकतो की फोन उचलायचा की नाही.

इनबॉक्स क्लीनर
अलिकडे फोन मध्ये भरपूर स्टोरेज येत असल्याने स्मार्टफोन वापरकर्ते SMS डिलीट करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. त्यामुळे truecaller अँप मध्ये असलेले Inbox Cleaner हे फिचर जुने आणि नको असलेले संदेश हटवू शकतो. आणि या साठी मेसेजेस निवडावे लागत नाहीत. मेनू मध्ये असलेल्या इनबॉक्स क्लीनर या बटनावर क्लिक केल्यावर तुम्ही OTP चे SMS आणि स्पॅम SMS किती येतात ते पाहू शकता आणि हे मेसेज हटवू शकता.


ब्लॉक नंबर सिरीज
बऱ्याच युजर्सना संपूर्ण दिवसात अनेक कॉल येतात. यात स्पॅम आणि चुकीच्या नंबर्सचा समावेश असतो. Truecaller चे प्रगत Call Blocking हे फिचर वापरून  या समस्येवर निदान करू शकता. Truecaller अँप दररोज स्पॅम कॉलची लिस्ट अपडेट करते. प्रीमियम युजर्सना हे फिचर आपोआप काम करते. तर मोफत युजर्सना हे स्वतः करावे लागते. आणि जर तुम्हला वेगळ्या देशातून नंबर सिरीज द्वारे कॉल येत असतील तर या फिचर द्वारे त्याला आळा घालू शकता. Truecaller settings मध्ये जाऊन $ चिन्हावर क्लिक करा.


स्मार्ट एस एम एस

Smart SMS फिचर द्वारे आपणास येणारे SMS हे स्पॅम आहेत की उपयुक्त हे कळते. आपल्याला येणारे 80 % SMS हे व्यावसायिक असतात. त्यामुळे स्पॅम फिल्टर करण्यासाठी आणि उपयुक्त संदेश यांचे वर्गीकरण करण्यासाठी sms अँप स्मार्ट असणे गरजेचे आहे. ट्रू कॉलर च्या या फिचर द्वारे OTP वाले मेसेज, बँकेकडून आलेले मेसेज आणि इतर मेसेज असे वर्गीकरण केले जाते.


अश्याच महत्वाच्या माहितीसाठी 'जीवन मराठी' ला फॉलो करा.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads