Amazon

Ads Area

header ads
header ads

व्हॉट्सअ‌ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम रात्री अचानक का पडलं बंद? Whatsapp, Instagram, Facebook Server Down

काल रात्री आपल्या फोनमध्ये Whatapp आणि facebook, Instagram चे नोटिफिकेशन्स येणं बंद झालं आणि लोड होणं पण बंद झालं असेल. फ्लाईट मोड ऑन ऑफ करून पाहिलं, डेटा ऑन/ऑफ करून पाहिलं, डेटा बॅलन्स चेक करून पाहिलं, मोबाईल स्विच ऑफ किंवा रेस्टार्ट करून सुद्धा कोणतेही अपडेट्स, नोटिफिकेशन मिळाले नाहीत याच मुख्य कारण म्हणजे संपूर्ण जगातील फेसबुकशी कनेक्ट असलेले अ‍ॅप्स बंद पडले होते. आज बातमी मध्ये सगळ्यांच्या प्लॅटफॉर्म वर चर्चा सुरू आहे ती सर्व्हर डाऊनची.
सर्व्हर डाऊन होत म्हणजे काय?

ऑनलाईन माहितीच्या आधारे, 'सर्व्हर' हा इंग्रजी शब्द असून तो 'सर्व्ह' ह्या शब्दापासून आलेला आहे. याचा अर्थ ‘सेवा देणे’ असा होतो. तर 'सर्व्हर' याचा अर्थ सेवा देणारा असा होतो. इंटरनेट युगात सर्व्हर म्हणजे एक शक्तिशाली संगणक असतो जो सर्व माहितीची आदान प्रदान करण्यात मदत करतो. तर सर्व्हर स्लो होतो म्हणजे या संगणकाकडे येणारे  काम वेळेत पूर्ण करू शकत नाही. आणि सर्व्हर डाऊन म्हणजे या संगणकाकडे काम एकदम आल्याने तो काम थांबवतो.त्यावेळी सर्व्हर डाऊन होतो.


रात्री सर्व्हर कधीपासून डाऊन झाला.

सोमवारी रात्री 9 वाजल्यापासून लोकप्रिय मेसेंजिग अ‌ॅप व्हॉट्सअ‌ॅपचे सर्व्हर अचानक बंद झाले. या मुळे यासंबंधीत असणंऱ्या सुविधा मेसेजिंग, व्हिडीओ कॉल, ग्रूप चॅट, ही सर्व फिचर्स  बंद पडल्या.

यूजर्सने पाठवलेले मेसेज जात नव्हते. मात्र आता तब्बल 6 तासानंतर हे सर्व अ‍ॅप्स पुन्हा एकदा सुरु झाले आहेत. 

इंस्टाग्राम डाऊन, फेसबुक डाऊन, व्हाट्सअ‍ॅप डाऊन असे ट्रेंड देखील अन्य सोशल मीडियावर सुरु झाले आहेत. तेव्हा सर्व्हर डाऊन असल्याचं समजलं. बरेच युजर्स हैराण यामुळे झाले होते. 



मार्क झुकेरबर्गला 7 अब्ज डॉलर्सचे नुकसान
फेसबुक-व्हाट्सअपने दिलं स्पष्टीकरण..

फेसबुकच्या टीमने स्पष्टीकरण देताना म्हटलंय की, "आम्हाला माहिती आहे की, काही लोकांना आमच्या अ‍ॅप्स आणि उत्पादने वापरण्यामध्ये अडचणी येत आहेत. आम्ही शक्य तितक्या लवकर गोष्टी पूर्ववत करण्यासाठी काम करत आहोत आणि होत असलेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. व्हाट्सऍपने म्हटलंय की, 'काहींना सध्या व्हाट्सअ‍ॅप वापरण्यामध्ये अडचण येत असल्याचं आम्ही जाणून आहोत. परिस्थिती लवकरात लवकर पूर्ववत होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. याबाबत आम्ही लवकरच माहिती देऊ", असं म्हटलं आहे.

अश्याच महत्वाच्या माहितीसाठी 'जीवन मराठी' ला फॉलो करा.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads