तुम्हाला ही बातमी ऐकून माहीतच असेल , शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूज शिप वर ड्रग प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान चे नाव एका पार्टीत आले आहे त्यामुळे NCB च्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन चांगलीच चौकशी सुरू केली आहे. परिणामी त्याचे वडील शाहरुख खान यांच्या व्यावसायिक जीवनावर याचा फारच आटापिटा होत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, शाहरुख खान आपल्या आगामी 'पठाण' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी स्पेनला जाणार होता. स्पेनमध्ये दीपिका पादुकोण आणि शाहरुख यांच्या गाण्याची शूटिंग ही निश्चित केली गेली होती. परंतु आर्यन खानच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शाहरुख आपले शूटिंग लांबणीवर टाकण्याची किंवा रद्द करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
क्रूज मधील पार्टी मध्ये आर्यनचा मित्र अरबाज मर्चंट सुद्धा सामील होता. अरबाज सेट मर्चंट आणि आर्यन खान चांगले मित्र आहेत आणि अरबाजचे अमली पदार्थांशी जास्त जवळचे नाते असल्याचे बोलले जात आहे.
या प्रकरणात एनसीबीचे एक मुख्य आणि जबाबदार अधिकारी समीर वानखेडे सध्या अरबाज मर्चंट ची चांगलीच चौकशी करत आहेत तर आर्यन खानच्या चौकशीची जबाबदारी व्ही. व्ही. एस सिंह यांच्याकडे आहे.
आर्यन खान नेहमीच एकांतात जगणे पसंत करत असे. वेगवेगळ्या कलेमध्ये त्याने बाजी मारली आहे. पण बॉलिवुडच्या कोणत्याच कार्यक्रमात त्याचा सहभाग नसायचा. तरीसुद्धा त्याचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. आणि ह्या घटनेनंतर सर्व चाहत्यांनाही खूप मोठा धक्का बसला आहे.


