Amazon

Ads Area

header ads
header ads

SIP सुरू करताय? या 'चुका' नक्की टाळा म्हणजे नुकसान होणार नाही | Avoid Mistakes

Mutual Fund हा अलीकडे सर्वांच्या आवडीचा आणि परिचयाचा गुंतवणूक करण्याचा पर्याय बनला आहे. प्रत्येक महिन्याला थोडी थोडी रक्कम भरण्याचा पर्याय म्युच्युअल फंडात उपलब्ध असल्याने SIP अर्थात सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनला सर्वजण प्रथम प्राधान्य असते. SHARE MARKETमध्ये गुंतवणूक करण्याची जोखीम न स्वीकारता चांगला फायदा मिळवण्यासाठी गुंतवणूकदार SIP चा वापर करून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात.
SIP द्वारे आपल्या पसंतीच्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करता येते. आणि अस करणं फायदेशीर सुद्धा असल्याचे सिद्ध झाले आहे. पण गुंतवणूकदार म्हणजेच नवीन गुंतवणूकदार माहीत नसल्याने, चुका करत असल्याने नुकसान सहन कराव लागत. चला तर जाणून घेऊ या लेखात कोणत्या चूका न केल्यास फायदा होईल.


शेअरबाजारात असलेली तेजी बघून गुंतवणूक करू नका
ज्यावेळी शेअर बाजारात तेजी मध्ये असतो त्यावेळी लाभ होईल म्हणून अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करतात. मात्र आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो बाजार ज्या वेगाने वर जाऊ शकतो त्याच वेगाने खाली सुद्धा येऊ शकतो. त्यामुळे मॅच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत असताना बाजार पाहून कधीही गुंतवणूक करू नका तर यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी शिस्त आणि संयम याची गरज असते. त्यामुळे एस आय पी या पर्यायाचा उपयोग करून म्युच्युअल फंडात महिन्याला थोडी थोडी रक्कम गुंतवत चला यामुळे बाजार वाढला काय आणि कमी झाला काय आपली जोखीम कमी होते.

एनएव्ही कमी दिसला म्हणून स्वस्त फंड असा विचार नको
अनेक गुंतवणूकदार NAV म्हणजेच नेट Asset व्हॅल्यू कमी असल्यास ते म्युच्युअल फंड स्वस्त आहे म्हणून त्यात गुंतवणूक करतात आणि त्यातून जास्त परतावा मिळेल अशी आशा करतात. पण हे चुकीचं असून फंडाची NAV कमी अथवा जास्त होण्याची बरीच कारणे असतात. 
एखादया फंडाची NAV ही मालमत्तेच्या व्यवस्थापणाखालील बाजारभावावर अवलंबून असते. म्हणजे  नवीन फंडाची NAV जुन्या फंडापेक्षा कमी असणार कारण फंडाला वाढ होण्यासाठी कमी वेळ उपलब्ध असतो. तर चांगल्या व्यवस्थापनाखालील फंडाची NAV चांगली असेल. अश्यावेळी गुंतवणूकदारांनी NAV न बघता त्या फंडाची कामगिरी बघणे आवश्यक आहे. त्यांनी आखलेल्या भविष्यातील योजनांचा आढावा घेतला.



शेअर मार्केटमध्ये घसरण झाली म्हणून म्युच्युअल फंड बंद करू नका

बरेच गुंतवणूकदार शेअर मार्केटमध्ये घसरण झाल्यानंतर आपली एस आय पी थांबवतात आणि पुन्हा मार्केटमध्ये तिची आल्यानंतर चालू करतात मात्र शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असताना पहिला नियम आहे की तो कमी असताना विकत घ्यायचा असतो आणि वाढल्यानंतर मी खायचं असतो आणि या मूलभूत नियमाविरुद्ध ही वरील संकल्पना आहे त्यामुळे गुंतवणूकदार आज पर्यंत चा झालेला नफा देखील एका झटक्यात मध्ये गमावून बसतात त्यामुळे शेअर मार्केट जरी उतरत असला तरी आपली एसआयपी थांबू नका आणि योग्य फंडांमध्ये जर आपली गुंतवणूक केली असेल तर आपले नुकसान होणार नाहीये.


म्युचुअल फंडाला पुरेसा वेळ द्या

म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केल्यानंतर लगेच फायदा मिळेल असं नसतं यासाठी आपल्याला संयम बाळगावा लागतो काही वर्षे थांबावे लागतात काहीवेळा चांगला परतावा मिळतो तर काही वेळात कमी परतावा मिळतो मात्र या काळात देखील गुंतवणूक चालू ठेवायचे आहे. मॅच्युअल फंडाद्वारे केले जाणारे शेअर्समधील गुंतवणुकीचा चांगला परतावा येण्यासाठी या गुंतवणुकीसाठी किमान पाच ते आठ वर्ष वेळ देणे गरजेचे आहे. शेअर मार्केटमध्ये लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट केल्यास चांगल्या पद्धतीचा परतावा मिळाल्याचं सिद्ध झाला आहे त्यामुळे परतावा कमी मिळाला म्हणून लगेच पैसे काढू नये.


फंड सारखा बदलू नका.
मित्रांना या फंडात गुंतवणूक व त्या फंडात गुंतवणूक म्हणून तुम्ही त्या फंडात गुंतवणूक असं करू नका प्रत्येकाची आर्थिक उद्दिष्टे ही वेगळे असतात त्यांची परिस्थिती वेगळी असते आणि तुमची आर्थिक उद्दिष्टे आणि खिसा हा वेगळा असतो आणि त्या पद्धतीने गुंतवणूक करा.

प्रत्येक तिमाहीमध्ये या फंडांचे मूल्य बदलत असतं त्यामुळे आधी ची कामगिरी पाहूनच गुंतवणूक करणे आणि अपेक्षेप्रमाणे त्या फंडाने परतावा न दिल्याने त्यामध्ये बदल करणं हे नुकसानदायक आहे.

उद्दिष्ट ठरवा.

म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत असताना आपण आपले फायनान्शिअल ध्येयधोरणे ठरवूनच गुंतवणूक करायला हवा यामुळे आपल्याला योग्य पद्धतीने निधी गोळा करता येऊ शकेल आणि जर आपलं उद्दिष्ट त्यादृष्टीने पष्ट नसेल तर आपण चुकीच्या फंडांमध्ये गुंतवणूक करू आणि त्याचा परतावा योग्य मिळणार नाही.

जाहिरात:

SIP थांबवू नका
शेअर मार्केट पडला किंवा घसरण झाल्यावर अनेक गुंतवणूकदार आपली SIP थांबवतात. मात्र तसं न करता घसरत्या बाजारात शेअर स्वस्त झाल्याने आपल्याला कमी पैशांमध्ये अधिक युनिट मिळतात ही गोष्ट लक्षात ठेवूनच एस आय पी न थांबवता आपण ती भरली पाहिजे आणि शेअर बाजारात तेजी येते त्यावेळी आपल्याला त्याचा परतावा चांगला.

अशाच महत्वाच्या अपडेट साठी जीवन मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads