अभिनयाने व सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणारी मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर कायम सक्रिय असते.
शारदीय नवरात्रोत्सवाला आताच सुरुवात झाली आहे. नवरात्रीचा सण आली की बऱ्याच अभिनेत्री नवनवीन वेशभूषा करून फोटोशूट करत असतात. आणि त्यांचे चाहतेही अभिनेत्रींच्या या अनोख्या रुपाला पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात.
तेजस्विनी पंडित ह्या मराठी अभिनेत्रीने देखील मागील तीन वर्ष वेगवेगळ्या रूपात चाहत्यांच्या भेटीस नवरात्रीच्या दिवशी येत होती. त्यामुळे यावेळी तेजस्विनी वेगळं काय करेल याची उत्सुकता चाहत्यांना होती. मात्र, यंदा तेजस्विनी पंडित तिच्या निर्मिती संस्थेच्या कामामध्ये व्यस्त आहे आणि या कारणाने तिने यंदा नवरात्रीच्या निमित्ताने फोटोशूट करू शकली नाही. त्यामुळे तिने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत माफी मागितली आहे.
जाहिरात
तेजस्विनीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो पोस्ट करत हा मेसेज दिला. नमस्कार! कसे आहात ? सगळ्यांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !! सगळ्यात आधी तुमचे मनापासून आभार आणि माफी सुद्धा !! आभार तुम्ही दाखवलेल्या विश्वासाबद्दल की गेल्या ३ वर्षांप्रमाणे याही वर्षी मी नवरात्री निमित्त खास फोटो, संदेशांच्या माध्यमाने तुम्हाला भेटायला येईन, आणि माफी यासाठी की ते या वर्षी शक्य झालं नाही. दोन दिवस आधीपासूनच तुमचे असंख्य मेसेजस मला मिळत हो आणि कुठेतरी मनाला सुखावतही होते, आजच्या क्षणार्धात बदलणाऱ्या जगात तुम्ही माझ्या कलाकृतींची नोंद ठेवलीत हा माझा बहुमान आहे. अस तिनं लिहलं आहे.
पुढं तिने लिहलं आहे, पण तरीही या वर्षी मी कोणतीच संकल्पना साकारली नाही. अर्थात याची अनेक कारणे देखील आहेत आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे माझा नवनिर्मितीचा ध्यास. माझ्या production house कडून तुमच्यासाठी दर्जेदार कलाकृती घेऊन लवकरच येते आहे आणि Trust me its not at all an easy task. असं म्हणतात कोणतीच गोष्ट half heartedly करू नये, आणि रसिक प्रेक्षकांसाठी तर नाहीच नाही. आणि म्हणूनच या वर्षी जरा थांबण्याचा निर्णय घेतला. पण लक्षात घ्या हा पूर्ण विराम नाही, अर्ध विराम आहे..... आणि अर्धविराम पुढील वाक्याचा अर्थ अजून वाढवतो. तेंव्हा पुढच्या वर्षी अजून दमदार संकल्पने सह तन, मन, धन अर्पून तुमच्या समोर येईन. आणि या वर्षी माझी संकल्पना जरी तुमच्या समोर आली नसली तरी माझ्या अनेक चाहते, अनुयायी, सहरंगकर्मींनी प्रेरणेची ही मशाल पुढे धगधगत ठेवली आहे आणि याचा मला मनापासून आनंद आहे. तेंव्हा पुन्हा एकदा आभार आणि माफी पुन्हा एकदा !!! आणि ठाम विश्वास की हो पुढच्या वर्षी नक्कीच भेटू. अस म्हटलं आहे.
अश्याच महत्वाच्या अपडेट्ससाठी 'जीवन मराठी' ला फॉलो करा.


