Amazon

Ads Area

header ads
header ads

तब्बल 108 मेगापिक्सल कॅमेरा असलेल्या Samsung Galaxy S21 Ultra 5G ची किंमत किती?

Samsung Galaxy S21 Ultra 5G Camera Specs

Samsung Galaxy S21 Ultra 5G चा कॅमेरा हाच मुख्य मुद्दा आहे. या स्मार्टफोनमध्ये आपल्याला नव्या जनरेशनचा 108-megapixel मुख्य कॅमेरा मिळतो,
तर दुसरा कॅमेरा 12-megapixel अल्ट्रा वाईड अँगल आहे  सोबत 2 टेलीफोटो लेन्स असलेले कॅमेरे देण्यात आले आहेत. पाहिलं तर Samsung Galaxy S21 Ultra 5G चा रियर कॅमेरा आकर्षक आहे. आणि सेल्फी साठी असलेला कॅमेरा देखील येथे रियर कॅमेरासोबत स्पर्धा करतो. तो 40 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
 

 Samsung Galaxy S21 Ultra मध्ये आपल्याला सॅमसंगचा स्वतःचा प्रोसेसर Exynos 2100 5G SoC मिळतो. या प्रोसेसर मुळे हायएन्ड असलेले Call of Duty: Mobile and Asphalt 9: Legends सारखे गेम खेळण्यास मदत होते. Galaxy S21 Ultra हा स्मार्टफोन  Samsung's S Pen ला सपोर्ट करतो. मात्र आपल्याला हा पेन वेगळा घ्यावा लागतो. 
Samsung Galaxy S21 Ultra photos

Samsung चा हा नवा स्मार्टफोन Galaxy S21 Ultra 5G मीडिया साठवून ठेवायला उपयुक्त आहे. या स्मार्टफोनला  6.8-इंचाची AMOLED स्क्रीन देण्यात आली आहे, जी थोडी ब्राईट असून रंगसंगती रिच आणि पंची दाखवते.  या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 5,000mAh battery मिळते जी Galaxy S20 Ultra ला सुद्धा  एवढीच होती. मात्र ही आपल्या मध्यम वापराला दिवसभर टिकते. Galaxy S21 Ultra 5G चा नवीन डिजाईन आधीच्या मॉडेल पेक्षा चांगला दिसतो. Samsung'चा नवा contour-cut डिजाईन कॅमेरा मॉड्युलला नवा लुक देतो.


हा स्मार्टफोन 14 जानेवारी 2021 रोजी लॉन्च करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन वन UI आधारित अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टीम सहित येतो. या स्मार्टफोन मध्ये आपल्याला Face unlock, In-Display Fingerprint Sensor, Compass/ Magnetometer, Proximity sensor, Accelerometer, Ambient light sensor, Gyroscope, Barometer इतके सेन्सर मिळतात जे आपल्या मोबाईलच्या वापराचा अनुभव द्विगुणित करतात.

Samsung Galaxy S21 Ultra 5G price in India


या स्मार्टफोनच्या रॅम बद्दल बोलायचं तर यात 2 व्हेरिएंट येतात. 12GB आणि 16 GB असे हे दोन वेरीएन्ट असून याच्या इनबिल्ट स्टोरेजचे ही 2 व्हरीयंट असून त्याचे 256GB आणि 512GB असे व्हेरिएंट आहेत.






हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या