Amazon

Ads Area

header ads
header ads

फेसबुकचे मेटावर्स काय आहे? Metaverse Meaning in Marathi/Hindi

फेसबुकन 18 ऑक्टोबर रोजी घोषणा केली की, मेटावर्स उभारण्यासाठी त्यांचा युरोपियन युनियनमधील 10000 लोकांना पुढील पाच वर्षात रोजगार देण्याचा प्लॅन आहे. फेसबुकचे CEO मार्क झुकेरबर्ग यांनी जुलै 2021 मध्ये पहिल्यांदा Metaverseचा उल्लेख केला होता. पुढील काही वर्षांमध्ये लोकांनी फेसबुक कंपनीला मेटावर्स कंपनी म्हणून ओळखले पाहिजे, अशी फेसबुकचे  सीईओ मार्क झुकेरबर्ग यांची इच्छा आहे.
तर फक्त फेसबुकच नाही तर जगातले बऱ्याच मोठ्या कंपन्या मेटाव्हर्समध्ये गुंतवणूक करत आहेत.  

What is Metaverse?

चला तर जाणून घेऊ काय आहे मेटावर्स(Metaverse Meaning in Marathi/Hindi)

फेसबुक मेटाव्हर्सची व्याख्या व्हर्च्युअल स्पेसचा सेट म्हणून करतो. ज्याठिकाणी आपण इतर लोकांसह क्रियेट आणि एक्सप्लोर करू शकू जे आपल्या भौतिक स्पेसमध्ये नाहीत.
Metaverseचा उपयोग करून युजर्स 3D मध्ये इंटरनेटचा अनुभव घेऊ शकतील. म्हणजेच एखादी व्यक्ती भेटू शकतील, खेळू शकतील, काम करू शकतील किंवा सामील होऊ शकतील. म्हणजे केवळ कंटेंट म्हणून पाहण्यापेक्षा प्रत्यक्षात अनुभवत आहेत अस वाटेल.


अलीकडेच फेसबुकने मेटाव्हर्सबद्दल माहिती सांगितली आहे.  वास्तविक, यात, फेसबुकला अस काही आभासी जग तयार करायचे आहे जेथे लोक शरीराने नसतील मात्र व्हर्चुअल उपस्थित राहू शकतील.

फेसबुक व्हर्च्युअल उपस्थित असल्याची भावना निर्माण करण्यासाठी ऑगमेंटेड रिअॅलिटी (AR) व व्हर्च्युअल रिअॅलिटी (VR) यां तंत्रज्ञानाची मदत घेईल. यामुळे एखादी व्यक्ती वैयक्तिकरित्या संवाद साधताना प्रत्येक्षात तिथे असल्याचा अनुभव घेईल. या टेक्नॉलॉजीचा वापर करत Facebook Metaverse मध्ये 3 बिलियन युजर्स जोडण्याचा मानस आहे.

केवळ फेसबुकच नाही तर मायक्रोसॉफ्ट व एपिक गेम्स सारख्या कंपन्यासुद्धा मेटावर्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत.

मेटावर्समुळे  नवीन क्रिएटिव्ह, सामाजिक आणि आर्थिक संधी उपलब्ध करण्यात मदत करण्याची क्षमता असल्याच बोललं जातं आहे.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads