तर 19 ऑक्टोबर रोजी म्हणजे एक दिवस अगोदर IRCTC च्या स्टॉकमध्ये सुरुवातीला खूप तेजी होऊन ती ६३९६.३० रुपयांपर्यंत पोहचली होती. IRCTC मार्केट कॅपिटल 1 लाख कोटी रुपयांहून अधिक झाले होते मात्र शेअर बाजारात व्यवहार बंद झाल्यावर तो शेअर सुमारे 18 टक्क्यांनी घसरला म्हणजे सुमारे 1020.50 रुपयांनी याची किंमत कमी होऊन 4434.35 रुपयांवर स्थिर झाली.
F&O वर बंदी
IRCTC चे शेअर्स National Stock Exchange (एनएसई) च्या फ्युचर्स आणि ऑप्शन्सच्या बंद सूचीमध्ये गेले आहेत.
तर मंगळवारी IRCTC च्या शेअर्समध्ये आणखी वाढ झाल्यावर त्याचे मार्केट कॅप 1 लाख कोटी रुपयांहुन वर गेलेल्या यादीत IRCTC चा दहावा क्रमांक लागलेली सरकारी कंपनी बनली असल्याची माहिती मिळत आहे.
नॅशनल स्टॉक एक्सचेंजनुसार, बाजारपेठ मर्यादेनुसार ९५ टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याने IRCTC च्या शेअर्सने ओलांडल्याने त्याच्यावर फ्युचर्स आणि ऑप्शन्स सेगमेंटमध्ये बंदी घालण्यात आली होती.
दिनांक 20 ऑक्टोबर बद्दल बोलायचं तर IRCTC share Price 4999.80 रुपयांवर High ला पोहचले होते.
तर ते 4,377.30 पर्यंत Low झाले होते. ते आता 4,434.35 वर आले आहे.


