Amazon

Ads Area

header ads
header ads

काय फेसबुक नाव बदलण्याच्या तयारीत आहे? Facebook Name Change?

सोशल मीडियामधील सर्वात मोठी कंपनी फेसबुक पुढील आठवड्यात फेसबुकचे नाव बदलून नव्या नावाने रीब्रँड करण्याची योजना आखत असल्याचे वृत्त द व्हर्ज यांनी दिल आहे.(FaceBook Name Change) 28 ऑक्टोबर रोजी फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग कंपनीच्या वार्षिक कनेक्ट कॉन्फरन्समध्ये नाव बदलण्याविषयी बोलण्याची योजना आखत आहेत, आणि नावाबद्दल लवकरच माहिती कळू शकेल, अस व्हर्जन म्हटल आहे.(Facebook new name)
याबद्दल उत्तर देत असताना फेसबुकच्या प्रवक्त्याने म्हटले  “अफवा किंवा अटकळ यावर टिप्पणी करत नाही.” दरम्यान फेसबुकला सध्या त्याच्या व्यवसायाच्या पद्धतींवर अमेरिकन सरकारच्या वाढत्या तपासणीला सामोरे जावे लागत आहे आणि त्यावेळी ही बातमी समोर येत आहे.

 या रीब्रँडिंगमुळे तथाकथित मेटावर्स,( Metaverse Facebook ) म्हणजे  एक ऑनलाइन जग बनवण्यावर फेसबुकचे लक्ष फोकस होईल. जेथे लोक व्हर्च्युअल इनवोरमेण्टमध्ये मूव्ह करण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी विविध उपकरणांचा वापर करू शकतील.  फेसबुकने व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) आणि ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर) मध्येही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली असून याद्वारे सुमारे तीन अब्ज युजर्सना अनेक डिव्हाईस आणि अॅप्सद्वारे जोडण्याचा त्यांचा मानस आहे.

मंगळवारी, फेसबुकने या मेटावर्स (metaverse meaning )बनवण्यासाठी मदत करावेत म्हणून पुढच्या 5 वर्षांत युरोपियन युनियनमध्ये 10,000 लोकांना रोजगार देण्याच्या योजनांची घोषणा केली. CEO झुकेरबर्ग जुलै महिन्यापासून या मेटावर्सवर बोलत आहेत.

व्हर्ज दिलेल्या रिपोर्ट्समध्ये, फेसबुकचे संभाव्य नाव Horizon संबधीत असू शकेल.  दरम्यान, फेसबुकने 'Horizon' नावाच्या आपल्या डेव्हलपमेंटमध्ये असलेल्या व्हीआर गेमिंग प्लॅटफॉर्मचे नाव बदलून 'Horizon Worlds' ठेवले आहे.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads