हिंदू धर्मातील महिलांसाठी सौभाग्याचा उपवास करवा चौथ दिवशी केला जातो, हा दिवस कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरा जातो. करवा चौथ कधी आहे? असा जर प्रश्न आपण विचारला तर मी याच उत्तर 24 ऑक्टोबर 2021 रोजी हा सण साजरा केला जाईल असा सांगेन.
करवा चौथ दिवशी हिंदू स्त्रिया त्यांच्या पार्टनरसाठी दीर्घायुष्य आणि आनंदी आयुष्य लाभो यासाठी निर्जल उपवास धरतात. हा सण भारतात विशेषतः उत्तर भारतात छत्तीसगड, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान, बिहार, हरियाणा, दिल्ली आणि महाराष्ट्रातील काही भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यासाठी बाजारातील दुकाने सजवण्यात येतात. कलश, चाळणी, करवा चौथ कथेचे पुस्तक, करवाव्यतिरिक्त, विवाहित लोकांच्या श्रुंगार करण्यात उपयोगी येणाऱ्या वस्तू दुकानात ठेवल्या जात आहेत.
तर करवा चौथ(karva Chouth)च्या निमित्त साधत महिलांनी बाजारपेठांत खरेदीस सुरुवात करतात.
करवा चौथदिवशी शुभ योग बनत आहेत
ऑनलाईन मिळालेल्या माहितीनुसार, विवाहित महिलांनी त्यांच्या पतीसाठी दीर्घयुष्यासाठी ठेवलेला उपवास म्हणजे करवा चौथ यावेळी अनेक चांगल्या योगाने येत आहे. यंदा कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थी तारीख रविवार, 24 ऑक्टोबर 2021 रोजी येत आहे. ( 2021 ka karva chauth kab hai )विशेष म्हणजे पाच वर्षांनंतर हा शुभ योग करवा चौथवर पुन्हा एकदा तयार होत आहे. यावेळी करवा चौथ, रोहिणी नक्षत्रामध्ये पूजा केली जाईल, (Karva chauth pooja vidhi)तर 24 तारखेला रविवार असल्यामुळे व्रत करणाऱ्या महिलांना सूर्य/रवीदेवाचे आशीर्वादसुद्धा मिळतील.( Karwa Chauth Vrat Kab Hai ) मुख्यपणे विवाहित लोकांसाठी, हा करवा चौथ सौभाग्य देईल. करवा चौथच्या दिवशी देवी पार्वती, भगवान शिव, कार्तिकेय आणि गणेशासह शिव परिवाराची पूजा केली जाते.(karva chauth pooja chi vidhi) देवी पार्वतीमाता कडून सुहासनी सौभाग्याची इच्छा करतात. तर या दिवशी कर्वेमध्ये पाणी भरून कथा ऐकवली जाते. स्त्रिया सकाळी सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत पाणी सुद्धा न घेता हा उपवास करतात आणि चंद्रोदय पाहून त्याला पाणी वाहून नैवेद्य दाखवून उपवास सोडतात.
करवा चौथच्या पूजेसाठी शुभवेळ कधी आहे?
ऑनलाईन मिळालेल्या वृत्तानुसार रोहिणी नक्षत्रामध्ये चंद्रोदय होईल आणि यावेळी पूजा करता जाईल. कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी या वर्षी 24 ऑक्टोबर 2021 रोजी रविवारी सकाळी 03:01 वाजता सुरू होणार आहे आणि 25 ऑक्टोबरच्या दिवशी दुसऱ्या दिवशी पहाटे 5:43 पर्यंत चालू राहणार आहे. या दिवशी चंद्र उगवण्याची वेळ( Karwa Chauth Moon Rise ) सकाळी 8:11 वाजता आहे. 24 ऑक्टोबर 2021 रोजी संध्याकाळी 06:55 ते 08:51 पर्यंत पूजेसाठी शुभ वेळ असेल.


