Amazon

Ads Area

header ads
header ads

Facebookला का ठोठावला ब्रिटनने 500 कोटींहून अधिक रुपयांचा दंड? कारण काय?

प्रसिद्ध सोशल मीडिया कंपनी फेसबुक (Facebook) परत वादात सापडली आहे. फेसबुक कंपनीला सुमारे 50 दशलक्ष डॉलर्सचा दंड युनायटेड किंगडमच्या (UK) Competition and Markets Authority (CMA) ने ठोठावला असल्याची बातमी समोर येत आहे. 
 Giphy च्या अधिग्रहणाशी संबधी माहिती फेसबुकन जाणूनबुजून लपवली आहे अशी माहिती नियामकाला तपासात आढळून आल्यावर CMA कडून दंड आकारण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. फेसबुकवर  CMA ने  अशी कारवाई पहिल्यांदाच करत आहे. प्राधिकरणाकडून  अस सांगितलं गेलं की, आवश्यक असलेली माहिती फेसबुक जाणीवपूर्वक देत नाहीय.


यंदा फेसबुकच्या 400 दशलक्ष डॉलर्सच्या संपादनाबाबत CMA ने चौकशी सुरू केली होती. यावेळी CMA ने म्हटले की, कायद्यापेक्षा कोणतीही कंपनी मोठी असू शकत नाही. सीएमएने दिलेल्या रिपोर्ट्स मध्ये सांगितले की, माहिती देण्यास नकार देणे हे सिद्ध करते की, कंपनी Initial Enforcement Order (IEO) साठी बांधील होती.

CMA चे संचालक जोएल बामफोर्ड यांनी म्हटलं आहे,  फेसबुकला आम्ही इशारा दिला असून आम्हास महत्त्वाची माहिती देण्याला नकार देणे. हे आदेशाचे उल्लंघन मानले जाईल.’ दोन वेगवेगळ्या न्यायालयांत केलेले अपील फेटाळल्यावर सुद्धा फेसबुक कायदेशीर जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे.

दरम्यान, काही रिपोर्ट्स नुसार फेसबुक त्याच्या रि-ब्रँडिंगची तयारी करत आहे. याबद्दल सविस्तर माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

फेसबुकच मेटावर्स काय आहे?( metaverse facebook) वाचा संपूर्ण माहिती मराठीमध्ये.


अश्याच महत्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठी 'जीवनमराठी.कॉम' फॉलो करा.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads