व्हायरल बातमी : विकी कौशल आणि कतरिना हे डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात एका मोठ्या रिसॉर्टवर लग्न करणार असल्याचे समजले आहे. दोघांच्या घरी लग्नासाठी जोरदार तयारी करत आहेत. विकी आणि कतरीना यांनी ते एकमेकांसोबत रिलेशनमध्ये असल्यावर मौन बाळगले आहे. परंतु त्यांच्यातील रिलेशन सर्वांसमोर उघडकीस आले आहे. आता लवकरच हे दोघेजण लग्न करणार असल्याची चर्चा सुरू आहे.
विकी आणि कतरिना च लग्न या रिसॉर्टवर:
त्यांच्या लग्नाची तयारी खूपच गौप्य आणि लपूनछपून सुरू आहे.येत्या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ते लग्न करणार असल्याचे बातमी वाऱ्यासारखी पसरते आहे पण ते दोघे लग्न करणार तर कोठे?
कतरीना आणि विकी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील Six Senses Fort Barwara या आलिशान रिसॉर्टमध्ये मॅरेज प्लॅन करत आहेत. पण या बातमीला अजून दुजोरा मिळालेला नाही.
गुप्त बातमी:
या लग्नासाठी कतरीना कैफचे ड्रेस सुप्रसिद्ध डिझाईनर सब्यासाची करत आहे. अर्थात या लग्नाच्या वृत्ताबद्दल दोघांनी अथवा त्यांच्या कुटुंबियांनी कोणतीही घोषणा केलेली नाही. विकी कौशलचे वडील शाम कौशल यांना प्रचंड शुभेच्छा मिळत आहे, परंतु ते कुणालाही प्रतिउत्तर देत नाहीत. त्याच सोबत कतरीनाची कुटुंब देखील याबाबत मौन बाळगून आहे.


