कर्जामध्ये बुडालेल्या सरकारी विमान कंपनी एअर इंडियाची मालकी आता टाटा सन्स कंपनीने मिळविली आहे. याबद्दल अधिकृत घोषणा केंद्र सरकारने आज (ता. 8) केली. टाटा समूहाने तब्बल 18000 कोटींची बोली एअर इंडियासाठी लावली.
1932 मध्ये JRD TATA यांनी 'TATA Airlines' ची स्थापना केली होती. त्यानंतर 1953 मध्ये तिचे राष्ट्रीयीकरण झाले होते. मागच्या काही वर्षांत अवस्था वाईट झाली होती आणि Air इंडियावर तब्बल 38366.39 कोटी रुपयांचे कर्ज झाले होते.
केंद्र सरकारने 2017 मध्ये अखेर 'एअर इंडिया'च्या खासगीकरणाला मंजुरी दिली. सरकारने 2018 मध्ये 'एअर इंडिया' विकण्याचा प्रयत्न केल्यावर तो अयशस्वी ठरला. सरकारने जानेवारी-2020 मध्ये पुन्हा निर्गुंतवणूक प्रक्रिया सुरू केली. 'एअर इंडिया'ला विकलं नसतं, तर सरकारला तिला बंद करावे लागले असते.
तब्बल 68 वर्षांनंतर स्वगृही
बऱ्याच जणांनी ही कंपनी विकत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र एअर इंडियासाठी टाटा समुहाने सुमारे 18000 कोटींची सर्वाेच्च बोली लावली. त्यामुळे तब्बल 68 वर्षांनंतर पुन्हा एकदा एअर इंडियाची कमान टाटाकडे देण्यात आली आहे.
टाटा समूहाने 18000 कोटींना 'एअर इंडिया'ची खरेदी केली आहे. या रक्कमेपैकी 15 टक्के रक्कम ही केंद्र सरकारला देण्यात येणार असून तर उर्वरित रक्कम कर्जफेडीसाठी वापरली जाणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.


