Amazon

Ads Area

header ads
header ads

तुमचा Mobile फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो का? असे तपासा ! खाली दिलेल्या टिप्स फॉलो करा.

मार्केटमधले अनेक स्मार्टफोन्स फास्ट चार्जिंग सपोर्ट सह मिळतात. पण काही स्मार्टफोन्सना चार्जिंग सपोर्ट करत नाही. चला तर जाणून घेऊया तुमचा स्मार्टफोन फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करतो की नाही. त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या टिप्स फॉलो करून सहज पाहता येईल. नवीन आलेल्या आज कालच्या सर्व स्मार्टफोन्स ना फास्ट चार्जर आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट दिले जाते. स्मार्टफोनचा बजेट ही बाब ही त्यास संबंधित ठरते. पण काही फोन चार्जिंग सपोर्ट देत नाही. फोन मधील बिघाड ही गोष्ट वेगळी. पण तुम्हाला जाणून घेता येते की तुमचा फोन जलद चार्जिंगला समर्थन देतो की नाही?
जाणून घ्या ते कसे.... स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन शीट पहा. आपला आपला मोबाईल ज्या कंपनीचा आहे त्या कंपनीच्या वेबसाईटला भेट देऊन स्पेसिफिकेशन तपासून पहा. शिवाय मोबाईलच्या बॉक्स आणि युजर मॅन्युअल मधून तुम्हाला फास्ट चार्जिंग सपोर्ट या विषयी सर्व माहिती मिळेल. फास्ट चार्जिंग मेसेजेस. जेव्हा आपला मोबाईल चार्जिंगला लावलेला असतो तेव्हा फास्ट चार्जिंग, सुपर चार्जिंग, चार्जिंग रॅपिडली असे मेसेजेस पहायला मिळतील. पण तुमचा मोबाईल जर फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करत नाही तर हे मेसेजेस तुमच्या लॉक स्क्रीन वर दिसणार नाही‌. Goggle Play store वरून या ॲपद्वारे आपला चार्जिंग सपोर्ट जाणून घ्या . गुगल प्ले स्टोअर वर जाऊन एंपियर आणि अक्यूबॅटरी हे ॲप डाऊनलोड करून यांच्या माध्यमातून तुमचा स्मार्टफोन किती चार्जिंग सपोर्ट देतो? तसेच टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे की नाही हे शोधता येते. मोबाईल असा चार्ज करा.. जर तुमच्या मोबाईल मध्ये फास्ट चार्जिंग सुविधा नसेल तर.. ◾ सर्वप्रथम आपला मोबाईल फ्लाईट मध्ये ठेवा त्यानंतर चार्ज करा असे केल्याने तुमचा फोन पटकन चार्ज होईल. ◾ तुमचा मोबाईल ज्या कंपनीचा आहे त्या कंपनीच्या ओरिजनल चार्जर ने मोबाईल चार्ज करावा. यामुळे बॅटरी चलन चार्ज होते तसेच त्यावर कोणताही दबाव येत नाही.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads