17 सप्टेंबर 1888 रोजी Michiyo Tsujimura यांचा जन्म सैतामा च्या ओकेगावा मध्ये झाला. प्रथम त्यांनी होक्काइडो इम्पीरियल युनिव्हर्सिटी येथे अनपेड लॅबोरेटरी असिस्टंट म्हणून काम केले. मात्र हे काम त्यांच्यासाठी आव्हान होत कारण त्या काळात होक्काइडो इम्पीरियल युनिव्हर्सिटीत महिलांना प्रवेश नव्हता. त्यानंतर काही वर्षांनंतर टोकियो इम्पीरियल युनिव्हर्सिटी येथे आल्या. येथे त्यांनी ग्रीन टी या विषयावर बायो केमेस्ट्रीवर अभ्यास करण्यास सुरूवात केली.
vitamin B1 चा शोध लावलेल्या Dr Umetaro Suzuki यांच्याबरोबर Michiyo Tsujimura यांना काम करायची संधी येथे मिळाली. या संशोधनातून ग्रीन टी यात व्हिटॅमिन C चा सुद्धा समावेश आहे हे संशोधन केलं. 1949 साली त्यांनी एज्युकेटर म्हणून इतिहास रचला. त्या अनेक वर्ष विद्यापीठाचे प्राध्यापक म्हणून काम केले. टोकियो महिला उच्च सामान्य शाळेमध्ये 1950 पासून काम करण्यास सुरूवात केली. पुढे पहिल्या गृह आर्थिक विद्याशाखेचे डीन म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. 1956 - Japan Prize of Agricultural Science तर 1968 - Order of the Precious Crown of the Fourth Class याने सन्मान करण्यात आला. यांच निधन 1 जून 1969 रोजी वयाच्या 81 व्या वर्षी Toyohashi, ऐची, जपान येथे झाल.


