Apple Mega Event 2021 Updates:
आज अॅपल या टेक्नॉलॉजी कंपनीचा मेगा लाईव्ह इव्हेंट पार पडला हा कार्यक्रम सुरू होताच एकच जल्लोष झाला. यंदा Appleने मेगा इव्हेंटमध्ये (Apple mega event 2021) iPhone 13, अॅपल वॉच, iPad सोबत त्यांची अनेक प्रॉडक्ट लॉन्च केले आहेत. सदर लॉन्च इव्हेंटमध्ये अॅपल कंपनीने आयफोन 13 मिनी, आयफोन 13 प्रो आणि आयफोन 13 प्रो मॅक्सच्या भारतातल्या किंमती सुद्धा जाहीर केल्या. भारतासाठी iPhone 13 च्या किंमतीसह विक्रीची तारीख देखील जाहीर करण्यात आली. नव्या iPhone 13 सीरिजच्या स्मार्टफोनमध्ये अपग्रेडेड ए 15 प्रोसेसर आणि लॉंग बॅटरी लाइफसह येणार आहे.
भारतामध्ये आयफोन 13 या बेस मॉडेलची 128GB व्हेरिएंटची किंमत ७९,९०० रुपये असेल. तर iphone 13 - 256GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 89,900 रुपये असणार आहे. iphone 13- 512GB व्हेरिएंटची किंमत 1 लाख 9 हजार 900 रुपये असणार आहे. तर iPhone 13 Pro Max या स्मार्टफोन व्हेरिएंटची किंमत 128 जीबी फोन स्टोरेज साठी आपल्याला 1,29,900 रुपये पासून सुरू होईल. आयफोन 13 प्रो मॅक्स- 256GBची किंमत१,३९,९०० रुपये असणार आहे तर आयफोन 13 प्रो मॅक्स- 512GB ची किंमत १,५९,९०० इतकी असणार आहे. आणि आणि आयफोन 13 प्रो मॅक्सच्या 1TB स्टोरेज पर्यायांची किंमत 1,79,900 रुपये असेल.
iPhone 13 Pro और iPhone Pro Max ची किंमती अनुक्रमे सुमारे यूएस डॉलर 999 आणि 1099 पासून सुरू होणार आहेत तर हे स्मार्टफोन युजर्सना 17 सप्टेंबरपासून प्री-ऑर्डर करण्यासाठी उपलब्ध केले जाणार आहेत. तर या स्मार्टफोनची पहिली विक्री 24 सप्टेंबरपासून सुरु होणार असल्याची माहिती या मेगा इव्हेंट मध्ये देण्यात आली. मात्र यांची भारतीय किंमत जाहीर करण्यात आलेली नाही.
iPhone 13 Pro Camera, Specs
iPhone या स्मार्टफोनचे कॅमेरा बद्दल सर्वाना कुतूहल असत चला पाहूया iPhone 13 Pro चा कॅमेरा कसा आहे. 'आयफोन तेरा प्रो' चा टेलिफोटो लेन्स (77cm) 3x ऑप्टिकल झूम सहित येतो. या स्मार्टफोनमधील अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि वाइड-अँगल कॅमेरा लेन्स सुधारण्यात आले आहेत. त्यामुळे लो लाईट कंडिशनमध्ये सुद्धा हा स्मार्टफोन खूप चांगल्या प्रकारे काम करु शकेल. Apple iPhone 13 Pro स्मार्टफोनमध्ये मायक्रो फोटोग्राफी लेन्स सुद्धा देण्यात आले आहे. तिन्ही बॅक कॅमेरे नाईट मोडला सपोर्ट करतात.
iphone 13 Pro आणि Pro Max हे चार कलर व्हेरिएंट मध्ये उपलब्ध होणार आहे. यातील गोल्ड आणि ब्लू रंग iPhone च्या चाहत्यांना विशेष आवडीचा आहे. कंपनीने गुलाबी रंगात देखील आयफोन 13 लॉन्च केला आहे.
आयफोन 13 आणि iPhone 13 Mini 5 G कनेक्टिव्हिटी सपोर्टसह येतो. iphone 13 ची Price यूएस डॉलर 699 पासून सुरू होते.
iphone 13 स्मार्टफोनची डिस्प्ले साईज 6.1 इंच आहे तर iPhone 13 Mini ची स्क्रिनसाईज 5.4 इंच आहे.यावेळी कंपनीने आयफोनच्या डिस्प्लेवर असणारे नॉच 20 % कमी केले असून फेस आयडी सेन्सर सोबत हे सर्व स्मार्टफोन येतात.
आयपॅड मिनी लॉन्च
Apple ने आयपॅड मिनीच्या रूपात आपले दुसरे उत्पादन लॉन्च केले. आयपॅड मिनी Apple प्रेमींसाठी खूपच धक्का देणारा ठरला आहे, कारण युजर्सना या उत्पादनाबद्दल लॉन्च होईल याची अजिबात कल्पना नव्हती. तर आयपॅड मिनीमध्ये 8.3-इंच स्क्रीन असून टच आयडी बटणासह येते. या प्रोडक्ट मध्ये CPU मध्ये 40 टक्के अपग्रेड देण्यात आले असून A13 बायोनिक चिपसेटवर iPad Mini चालते. महत्वाचे म्हणजे 5G कनेक्टिव्हिटीला ipad mini सपोर्ट करते.
अॅपल वॉच 7 सीरीज लॉन्च
कंपनीने अॅपल वॉच 7 सीरीज देखील या लॉन्च इव्हेंटमध्ये लॉन्च केली आहे.
Apple Watch 7 Series च्या Price बद्दल बोलायचे तर यूएस डॉलर 399मध्ये लॉन्च केले गेले आहे. हा Apple Watch 7 IPX6 धूळ प्रतिरोधनासह येतो. APPLE कंपनीच्या मते, Watch 7 18 तासांची बॅटरी आयुष्य देतो. तर मागील घड्याळ सीरिजपेक्षा 30 टक्के वेगाने चार्ज होतो.
अश्याच महत्वाच्या अपडेट्स साठी जीवन मराठी ला सगळ्या सोशल मीडिया वर फॉलो करा.
ही महत्वाची माहिती नक्की आपल्या प्रियजनांसोबत आणि ऍपल लव्हर्स सोबत शेअर करा.


