Amazon

Ads Area

header ads
header ads

भाजप नेते नितीन गडकरी यांना You Tube कडून मिळते दर महिन्याला इतकं मानधन.......

 भाजप सदस्य नितीन गडकरी हे आपल्या बिनधास्त आणि बेधडक भाषणासाठी नेहमीच पुढे असतात. केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितिन गडकरी यांना युट्युब कडून मोठी रक्कम मिळते असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले आहेत.

नेहमीच चर्चेत राहणारे केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितिन गडकरी यांच्या बद्दल एक जबरदस्त माहिती समोर आली आहे त्यांनी याबाबत आपल्या एका भाषणात व्यक्त केले आहेत नितीन गडकरींनी अनेकदा भाषणादरम्यान अगदी सर्व रसिकांसमोर अधिकाऱ्यांसमोर बीन पाण्याने धुलाई केली आहे.



अनेक भाषणात त्यांनी त्यांचे ठोस मत व्यक्त करून भाजप पार्टीतील अनेक गुंतागुंतीचे विषय सोडवले आहे.

त्यांची ही बिंदास्त भाषणं खूप पाहिली आहेत. पण या वेळी नितीन गडकरी यांनी स्वतः एक माहिती दिली आहे गडकरी म्हणाले की त्यांना प्रत्येक महिन्याला युट्युब कडून चार लाख रुपये दिले जातात. त्यांनी शुक्रवारी असलेल्या भाषणात असे व्यक्त केले की युट्युब वर त्यांचे (Nitin gadkari speech on YouTube) यावर खूप व्हिडिओ व्हायरल केले जातात आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे त्यांना महिन्याला चार लाख रुपयांची रॉयल्टी ( Royalty of RS 4 lakh per month)  मिळते.

पुढे ते असे म्हणाले की कोरूना च्या काळात त्यांची भाषण खुप प्रसिद्ध झाली .त्यामुळे वाचक वर्ग वाढला आहे आणि युट्युब कडून येणारे पैसे देखील वाढले आहेत गुजरात मधील भरूच मध्ये दिल्ली मेरा एक्सप्रेस वे च्या कामाची समीक्षा करीत असताना गडकरी याबाबत सगळ्यांना सांगत होते.

नितीन गडकरी यांचे पुढील वक्तव्यात असे आढळले की, त्यांच्या मंत्रालयात आता रस्ते बांधकाम अधिक सुलभ करण्यासाठी खूप प्रयत्न सुरू आहे .नितीन गडकरी यांनी कोविड १९चा संसर्ग दरम्यान लागू केलेल्या डाऊन मध्ये आपला वेळ कसा घालवला याबद्दल देखील शेअर केले.

लॉकडाऊन मुळे त्यांनी घरातील अनेक कामे करीत असताना स्वयंपाकही करीत होतो म्हणून मी शेफ झालो होतो असे व्यक्त केले.

शिवाय विविध प्रकारचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रसिद्ध करत होतो.

या माध्यमातून त्यांनी तब्बल ९५० लेक्चर दिले यातील अनेक लेक्चर्स परदेशातील विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांसमोर दिले आहेत.

आणि तेच व्हिडिओज यूट्यूब वर अपलोड केल्यामुळे वाचक वर्ग जलद गतीने वाढत गेले याशिवाय युट्युब चार लाख रुपये रॉयल्टी देणे सुरू केला आहे.


हरियाणामधील दिल्ली मुंबई एक्सप्रेस समीक्षा दरम्यान ते म्हणाले की हायवेचे बांधकाम सुरू असताना त्यांना सासरच्या घरावर बुलडोझर चालवण्यास सांगितलं होतं.

नितीन गडकरी यांनी सर्व मनातली गोष्ट सांगून आपले भाषण हे खूपच रोमांचक करीत असताना युट्युब कडून त्यांना मानधन मिळते हे ही गोष्ट त्यांनी प्रसिद्ध केली.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या