सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर कायम एखादा दुसरा हॅशटॅग ट्रेंड होत राहतो. मात्र ट्विटरवर शुक्रवारी सकाळपासून #BoycottRadhikaApte चा ट्रेंड टॉपवर आहे. अचानक राधिका आपटे युजर्सच्या निशाण्यावर आली आहे.
खरे म्हणजे, राधिका ट्रोल होण्याचे कारण तिचे वक्तव्य, ट्विट किंवा आगामी प्रोजेक्ट नाही, मात्र तिला पूर्वी केलेल्या बोल्ड शूट आणि चित्रपटांसाठी ट्रोल केले जात आहे. आज लोक चित्रपटामध्ये बोल्ड रोल केल्याबद्दल राधिकावर चिडले आहेत.
सोशल मीडियावर अश्लील सामग्रीचा प्रचार केल्याबद्दल युजर्स राधिकाला ट्रोल करत असून काही वापरकर्ते तिच्यावर भारतीय संस्कृती बिघडवल्याचा आरोपही करत आहेत.
एका युजरने संपूर्ण बॉलिवूडला निशाण्यावर घेतले आहे व हिंदी चित्रपट उद्योगावर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे.
राधिका आपटेने दमदार आणि बोल्ड अभिनयाने चित्रपटसृष्टीमध्ये विशेष स्थान निर्माण केले आहे. ती अंधाधुन, पार्चेड, रक्त चरित्र, पॅडमॅन, मांझी: द माउंटन मॅन, सेक्रेड गेम्स, रात अकेली है या चित्रपटांमध्ये पात्र साकारताना दिसली आहे. तर सध्या सुरू असलेली ट्रेंड हे तिच्या पूर्वीच्या अभिनयावरून केले जात आहे.
पाचर्ड या सिनेमातील तिच्या न्यू*ड सिनचे फोटो सद्या सोशल मीडियावर फिरत असून या फोटोजचा संबंध 'राज कुंद्रा प्रकरणा'शी लावला जात आहे.
अश्याच महत्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठी जीवन मराठी ला फॉलो आणि सबस्क्राईब करा.


