का झाली कंगना ट्रोल?
कंगनाने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. या फोटोजमध्ये कंगना राणौतने पांढरा पारदर्शक ब्रालेट घातला आहे. सोबत तिने पांढरी पँट परिधान केली आहे. काही सोशल मीडिया युजर्सना फोटोमधील कंगनाची बोल्ड शैली आवडली नाही आणि त्यांनी संस्कृतीची आठवण देत तिला ट्रोल करायला सुरुवात केली.
कंगनाने दिले 'हे' उत्तर
अशात, आता कंगना राणावत तिच्या Instagram स्टोरीद्वारे त्या ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिले आहे. कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केले ज्यामध्ये एक तरुणी प्राचीन भारतीय पोशाख परिधान केलेली दिसते. कंगनाने यासह लिहिले, 'जे मला सनातन धर्माचे ज्ञान देत आहेत, कृपया तुम्ही अब्राहमिकसारखे दिसता हे समजून घ्या.'
कंगनाचे आताचे प्रोजेक्ट
लक्षात घेण्यासारखे आहे की, कंगना आजकाल तिची आगामी फिल्म धाकड चे शूटिंग करत आहे. आणि जर कंगना राणौतच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचं, तर तेजस आणि थलायवी यां चित्रपटांचाही धक्कडसह अभिनेत्रीच्या खात्यात समावेश आहे. लक्षात घेण्याची बाब अशी की लोकडाऊनमुळे कंगनाचा चित्रपट थलायवीची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. तिन्ही चित्रपटांतील कंगनाचा लूक सोशल मीडियावर समोर आला आहे.


