आयुर्वेद, योग आणि संगीतोपचार या विषयांमधले तज्ज्ञ बालाजी तांबे यांचं वयाच्या 81 व्या वर्षी निधन झालं.
मागील काही दिवसांपासून प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर पुण्यातील खासगी रूग्णालयामध्ये उपचार सुरु होते. मात्र यादरम्यान त्यांचं निधन झालं आहे.
त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी वीणा, मुलगा सुनिल आणि संजय आणि स्नूषा व नातवंडे असा परिवार आहे.
तांबे हे आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांमधील तज्ज्ञ तसेच पुणे जिल्ह्यातल्या कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे संस्थापक होते.
त्यांनी आयुर्वेदामधली आणि अभियांत्रिकीची पदवी एकाच वर्षी मिळवली होती. तसेच आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यांवर संशोधन केलं होतं.
बालाजी तांबे यांच्या गर्भसंस्काराच्या विषयावरील पुस्तकांना जास्त मागणी होती. या पुस्तकांच्या लाखो प्रती विकल्या गेल्या. त्यासोबत या पुस्तकांचे इंग्रजीसह सहा भाषांमध्ये भाषांतर झाले आहे.
Related News:
Balaji Tambe news,


