महिंद्रा या ऑटोमोबाइल क्षेत्रातील कंपनीने आपल्या भविष्यातील उत्पादनांसाठी नवीन लोगो( Mahindra New logo ) जाहीर केला आहे. हा लोगो येणाऱ्या महिंद्रा XUV700 SUV वर पहिल्यांदा पाहायला मिळणार आहे. महिंद्रा कंपनीचा हा नवीन लोगो महिंद्राच्या सध्याच्या 21 वर्षाच्या लोगोची जागा घेईल आणि त्यांच्या सध्याच्या आणि भविष्यातील एसयूव्ही श्रेणी मध्ये दिसणार आहे.
आत्ताचा लोगो हा प्रथम 2000 मध्ये सादर करण्यात आला होता तर 2002 मध्ये स्कार्पिओ या गाडीवर पहिल्यांदा दिसला होता. तर महिंद्राच्या लाइन अप मधील इतर 'एसयुव्ही'ना नवीन लोगो काही टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. पहिल्यांदा महिंद्रा एसयूव्ही 700 लॉन्च होईल पण सध्या असलेला लोगो हा व्यावसायिक वाहन उत्पादने आणि शेती उपकरणे यांच्यावर कायम ठेवला जाईल.
महिंद्रा अँड महिंद्रा लि., ऑटो अँड फार्म सेक्टरचे कार्यकारी संचालक राजेश जेजुरीकर म्हणाले, “अग्रगण्य बदलाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे आमच्या ब्रँडचे परिवर्तन स्पष्ट करणे. आमची नवीन व्हिज्युअल ओळख ही आम्ही कशासाठी उभे आहोत याचे प्रकटीकरण आहे, कारण आम्ही वैयक्तिक शोध आणि साहसासाठी खरोखर वेगळा आणि अस्सल SUV ब्रँड तयार करतो. ही नवीन व्हिज्युअल ओळख स्वातंत्र्याची शक्तिशाली भावना जागृत करण्यासाठी तयार केली गेली आहे. ”
सदर नवीन लोगो दोन क्रोम-इन्फ्यूज्ड इलिमेंट्समध्ये येतो जे 'एम' हायलाइट करण्यासाठी रचलेले आहे, जो ब्रँडचे नाव महिंद्रा दर्शवतो.
कंपनीचे म्हणणे आहे की, हा नवीन लोगो 'एक्सप्लोर द इम्पॉसिबल' ब्रीदवाक्यापासून प्रेरणा घेतो आणि महत्वाकांक्षा आणि नवीन आव्हाने स्वीकारण्याची क्षमता दर्शवतो.


