इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सीईटी परीक्षा द्यावी लागणार होती.
मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाकडून ही सीईटी परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे. इयत्ता दहावीच्या गुणांवर मुलांना इयत्ता अकरावी ला प्रवेश द्या असे आदेश उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सरकारला दिले आहेत.
महाराष्ट्र राज्य मंडळाने दहावीचा निकाल हा अंतर्गत मूल्यमापनात द्वारे जाहीर केला होता त्यानंतर इयत्ता अकरावी साठी प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार याकडे सर्व विद्यार्थी वर्गाची आणि पालकांचे लक्ष लागून होते.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्णयानुसार अकरावी प्रवेशासाठी सीईटी म्हणजेच सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाणार होती ही परीक्षा ओएमआर उत्तर पत्रिकेचा वापर करून ऑफलाइन पद्धतीने होणार होती.
तसेच 19जुलै पासून सर्व मंडळाच्या विद्यार्थ्यांना त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार होती पण आता अकरावी ची सीईटी परीक्षा उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आले असून सीईटी परीक्षा रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यास ही उच्च न्यायालयाने नकार दर्शवला आहे.
याशिवाय सहा आठवड्यांमध्ये इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला देण्यात आले आहेत.
अकरावी ‘सीईटी’साठी ११ लाख अर्ज
राज्य मंडळातर्फे होणाऱ्या अकरावीच्या सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (सीआयएससीई) आदी मंडळांच्या ३६ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे, तर एकूण १० लाख ९८ हजार ३१८ विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरलेले आहेत.
अशाच महत्वाचे अपडेटसाठी 'jivan marathi' ला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही महत्वाची पोस्ट नक्की शेअर करा.


