Amazon

Ads Area

header ads
header ads

मला यांच्यासाठी गाणे गायचे आहे असे इंडियन आयडल पवनदिपजी राजन यांनी इच्छा व्यक्त केली. -Indian Idol Winner Pawandip rajan

 प्रसिद्ध गायक पवनदीप राजन इंडियन' आयडल' या रियालिटी कार्यक्रमाच्या १२ व्या पर्वाचा  विजेता ठरले आहेत. 15 ऑगस्ट रोजी या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले प्रसारित करण्यात आला. तब्बल १२ तास हा ग्रँड फिनाले सुरू होता. या कार्यक्रमाच्या  ग्रँड फिनालेमध्ये सहा स्पर्धकांमध्ये विजेतेपदासाठी चुरस होती. अखेर पवनदीपने बाजी मारत विजेतपद पटकावले. खूप मेहनती जिद्दी आणि सर्वांचे लाडके पवनदीप यांनी सर्वांचे आभार मानत काही इच्छा व्यक्त केल्या . 

भरपूर शुभेच्छांचा वर्षाव जरी होत असला तरी त्यांना दोन गोष्टी घडाव्यात अशी मनापासून इच्छा होती तेव्हा पवनदिपजी म्हणाले‌ कि पहिली गोष्ट म्हणजे त्यांना काही लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध गायकांसाठी गाणी गायची आहेत आणि दुसरी इच्छा म्हणजे ए आर रहमान आणि प्रीतम यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गाण्याची संधी मिळावी अशी त्यांची मोठी  इच्छा आहे. जर ह्या इच्छा पूर्ण झाल्या तर त्यांच्यासारखा भाग्यशील कोणीही नसेल असे त्यांचे मनोमत होते.

पवनदीप राजनने पुढे सांगितले की, 'करण जोहरने त्यांनाधर्मा प्रॉडक्शनसाठी गाण्याची संधी देण्याचे आश्वासन दिले आहेत. करण जोहर हे कधी त्यांना गाण्यासाठी बोलतात याची खूपच आतुरता त्यांना लागली आहे. एआर रहमान यांनी यांनीही त्यांना अनेकदा संधी दिली आहेत त्यांचा मी नेहमीच ऋणी आहे . अरुणिता कांजीलालने त्यांच्यासाठी दोन गाणी गायली आहेत. ते सर्व स्पर्धकांना नेहमीच मदत करतात ".


इंडियन आयडलच्या १२ व्या पर्वाचे विजेतेपद मिळविण्यासाठी त्यांना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करत होते.'पवनदीप केवळ उत्कृष्ट गायकच नाही तर तो अनेक वाद्येही उत्कृष्टपणे वाजवू शकतो. तसेच २०१५ मध्ये पवनदीपने 'द व्हॉईस ऑफ इंडिया' हा रिअॅलिटी कार्यक्रमाचेही विजेतेपद मिळवले होते. 


पवनदीप म्हणाला, 'हिमेश सरांनी मला पार्श्वगायनाची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.पवनदीप राजनला इंडियन आयडलच्या १२ व्या पर्वाचे विजेते घोषित करण्यात आले आणि त्याला ट्रॉफी देण्यात आली. तसेच काही बक्षिसेही मिळाली.ती ट्रॉफी घेत असताना त्यांना खूप वाईट वाटले कारण त्या ट्रॉफीवर सर्वांचा सारखाच अधिकार आहे, असे त्यांचे मत होते त्यांनी या कार्यक्रमाच्या शेवटच्या क्षणा बद्दल काहीच विचार केला नव्हता कारण त्यांच्या मनात इतकेच होते की कोणीही जिंकेल आणि ट्रॉफी मिळवेल तो मित्रच असे कारण आम्ही सर्वजण आता एक कुटुंब झालो आहोत.


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या